विद्यार्थ्यांना मोठा धक्का! सरकारने ‘या’ पदांसाठीची भरती केली रद्द

On: April 16, 2026 1:44 PM
MPSC Recruitment Cancelled
---Advertisement---

MPSC Recruitment Cancelled | राज्यात सरकारी नोकरी मिळवण्यासाठी हजारो विद्यार्थी अनेक वर्ष मेहनत घेत असतात. मात्र, ऐनवेळी भरती प्रक्रिया रद्द झाल्यास त्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरते. अशीच परिस्थिती सध्या निर्माण झाली असून Maharashtra Public Service Commission (MPSC) अंतर्गत होणारी लघुलेखक (स्टेनोग्राफर) पदांची भरती सरकारने अचानक रद्द केल्याने विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

या निर्णयामुळे विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठा फटका बसला आहे. अनेकांनी 4-5 वर्षे मेहनत घेत, क्लासेस लावून या पदासाठी तयारी केली होती. मात्र, भरती होण्याच्या आशेवर पाणी फिरल्याने विद्यार्थ्यांचे भविष्य अनिश्चित झाले आहे. (MPSC Recruitment Cancelled)

विद्यार्थ्यांचा संताप; आंदोलनाचा इशारा :

जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी या निर्णयाविरोधात जोरदार निषेध नोंदवला आहे. विद्यार्थ्यांनी गुलाबराव पाटील (Gulabrao Patil), चंद्रकांत सोनावणे (Chandrakant Sonawane) आणि सुरेश भोळे (Suresh Bhole) यांची भेट घेऊन आपली भूमिका मांडली. शासनाने भरती रद्द करण्याचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अशी त्यांची मागणी आहे. (Stenographer Vacancy Maharashtra)

विद्यार्थ्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, जर निर्णय मागे घेतला नाही, तर पुढील काळात तीव्र आंदोलन छेडले जाईल. राज्यभरातील स्टेनोग्राफर प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांनी एकत्र येत हा प्रश्न लढवण्याचा निर्धार केला आहे.

MPSC Recruitment Cancelled | 2018 नंतर भरतीच नाही; विद्यार्थ्यांची खंत :

महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांमध्ये स्टेनोग्राफरची अनेक पदे रिक्त आहेत. 2018 आणि 2022 मध्ये या पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली होती. मात्र, त्यानंतर प्रत्यक्ष भरती झाली नाही. आता तर भरतीच रद्द करण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आणि संताप वाढला आहे.

ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांनी या पदासाठी वर्षानुवर्षे तयारी केली आहे. अचानक भरती रद्द झाल्याने “आता पुढे काय?” असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. अनेकांनी आपली इतर करिअरची संधी सोडून या परीक्षेवर लक्ष केंद्रित केले होते, त्यामुळे आता त्यांच्यासाठी परिस्थिती अधिक कठीण झाली आहे.

News Title: Maharashtra Govt Cancels Stenographer Recruitment; Big Blow to Rural Students

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now