विधानसभेपुर्वी शिंदे सरकार महिलांना देणार मोठं गिफ्ट?, थेट बँक खात्यावर पैसे..

On: June 21, 2024 10:16 AM
Maharashtra government likely to implement schemes for women
---Advertisement---

Maharashtra government | लोकसभा निवडणुका पार पडल्या आहेत. आता राज्यात लवकरच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. यासाठी महायुतीसह महाविकास आघाडी तयारीला लागली आहे. अशात महाराष्ट्र शासन विधानसभेपुर्वी महिलांसाठी खास योजना राबवणार असल्याची माहिती आहे.

काही मीडिया रिपोर्टने म्हटलंय की, शिंदे सरकार खास महिलांसाठी मोठी योजना राबवण्याची शक्यता आहे. महिलांच्या उन्नतीसाठी विविध राज्य सरकारे चांगल्या योजना राबवत आहेत. यातीलच एक योजना म्हणजे ‘लाडली बहना योजना’, ही योजना मध्य प्रदेश सरकार राबवते.

महिलांना मिळणार मोठं गिफ्ट?

आता याच धर्तीवर महाराष्ट्र सरकार देखील निम्न, मध्यमवर्गीय महिलांच्या बँक खात्यावर थेट पैसे जमा करण्याच्या उद्देशानं एक योजना आखत असल्याची चर्चा आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही योजना राबवली जाऊ शकते.

लोकसभा निवडणुकीत कॉँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गरिबांच्या खात्यात आठ हजार रुपये जमा होतील, असं आश्वासन दिलं होतं. या घोषणेचा कॉँग्रेसला काही राज्यामध्ये (Maharashtra government) मोठा फायदा झाला.त्यामुळे शिंदे सरकार देखील अशीच एक योजना राबवणार असल्याची माहिती आहे.

महाराष्ट्र सरकार राबवणार मोठी योजना?

मध्य प्रदेश सरकार ‘लाडली बहना योजना’ या माध्यमातून महिलांच्या खात्यावर 1250 रुपये जमा करते. आता महाराष्ट्र सरकार यापेक्षा जास्त रक्कम देणार असल्याचं देखील म्हटलं जातंय.  या योजनेचा भाजपला मध्य प्रदेशमध्ये मोठा फायदा झाला आहे. त्यामुळे शिंदे सरकार देखील अशीच एक योजना (Maharashtra government)राबवणार असल्याची माहिती आहे. मात्र, याबाबत अधिकृत अशी कोणतीच माहिती अद्याप समोर आली नाही.

भविष्यात ही योजना खरंच आखली जाणार काय?, हे आता आगामी काळातच दिसून येईल. दरम्यान, मध्य प्रदेशात 1 कोटी 29 लाख महिलांना लाडली बहना योजनेचा लाभ मिळतो. गेल्या 11 महिन्यांपासून महिलांना हा लाभ दिला जातो. विवाहिता, घटस्फोटीत, विविध भगिनींना या योजनेचा लाभ दिला जातो. या याजनेचा लाभ घेण्यासाठी वयाची अट ही 21 ते 60 वर्ष आहे.

News Title :  Maharashtra government likely to implement schemes for women

महत्त्वाच्या बातम्या-

ग्राहकांना झटका! सोन्याचे भाव पुन्हा वधारले; जाणून घ्या आजचे लेटेस्ट दर

राज्यातील ‘या’ भागांना हवामान विभागाचा मोठा इशारा; ऑरेंज अलर्ट जारी

वट सावित्री पौर्णिमा का साजरी करतात? जाणून घ्या यामागचे कारण

सहा वर्षीय बालिकेला अत्याचार करुन संपवलं, संतप्त जमावानी केलं धक्कादायक कृत्य

मोठी बातमी! अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर

Join WhatsApp Group

Join Now