महाराष्ट्रातील ‘हे’ २ महामार्ग एकमेकांना जोडले जाणार! जाणून घ्या सविस्तर

On: December 22, 2025 4:19 PM
Maharashtra Expressway
---Advertisement---

Maharashtra Expressway | महाराष्ट्रातील दळणवळण व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवणारी एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांनी नागपूर-गोवा शक्तिपीठ द्रुतगती महामार्गाच्या संरेखनात महत्त्वाचा बदल केल्याची माहिती दिली. या बदलामुळे आता राज्यातील दोन अत्यंत महत्त्वाचे महामार्ग एकमेकांना थेट जोडले जाणार असून, प्रवाशांसाठी हा निर्णय दिलासादायक ठरणार आहे. (Shaktipeeth Expressway

राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) नागपूर ते गोवा प्रवास जलद आणि सुलभ व्हावा या उद्देशाने शक्तिपीठ महामार्गाची आखणी केली होती. मात्र, या प्रकल्पाला काही भागांतून वाढता विरोध होत असल्याने संरेखनात बदल करण्यात आला. नव्या आराखड्यामुळे महामार्गाची लांबी वाढली असली तरी राज्यातील अनेक जिल्ह्यांना याचा थेट फायदा होणार आहे.

शक्तिपीठ महामार्ग आणि जनकल्याण महामार्गाची थेट जोडणी :

सुधारित संरेखनानुसार नागपूर-गोवा शक्तिपीठ द्रुतगती महामार्ग आता थेट कल्याण–लातूर जनकल्याण द्रुतगती महामार्गाशी जोडला जाणार आहे. या जोडणीमुळे महाराष्ट्राच्या पूर्व, मध्य आणि पश्चिम भागांमधील दळणवळण अधिक वेगवान होणार असून, मुंबई, मराठवाडा आणि विदर्भ यांच्यातील अंतर लक्षणीयरीत्या कमी होणार आहे. (Kalyan Latur Expressway)

एमएसआरडीसीकडून प्रस्तावित जनकल्याण महामार्ग कल्याण ते लातूर या ४४२ किलोमीटर अंतराचा असून, हा प्रवास अवघ्या चार ते साडेचार तासांत पूर्ण होऊ शकणार आहे. बदलापूरपासून सुरू होणारा हा महामार्ग लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात औराद शहाजनी येथे समाप्त होईल.

Maharashtra Expressway | लातूर ते हैदराबाद, गोवा ते मुंबई प्रवास होणार अधिक सुलभ :

औराद शहाजनी येथून हा महामार्ग पुढे हैदराबादपर्यंत जाणार असून, मुंबई-हैदराबाद द्रुतगती महामार्गाची एकूण लांबी सुमारे ५९० किलोमीटर असेल. यामध्ये कर्नाटक आणि तेलंगणातील काही टप्पे संबंधित राज्यांकडून पूर्ण केले जाणार आहेत. यामुळे महाराष्ट्राबरोबरच शेजारील राज्यांशीही संपर्क अधिक मजबूत होणार आहे.

दरम्यान, नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाची लांबी वाढून सुमारे ८४० किलोमीटर झाली असून, आता या महामार्गातून एकूण १३ जिल्हे जोडले जाणार आहेत. लातूर जिल्ह्यातील मुरूड येथील बार्शी रोडवर शक्तिपीठ आणि जनकल्याण महामार्गासाठी भव्य इंटरचेंज उभारण्यात येणार आहे. (Maharashtra Expressway Upate)

या जोडणीमुळे लातूर, हिंगोली, परभणी, नांदेड आणि धाराशीव जिल्ह्यांतील नागरिकांना मुंबई आणि गोवा प्रवास काही तासांत करणे शक्य होणार आहे. भविष्यात हे दोन्ही महामार्ग विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेशी जोडले जाणार असल्याने जेएनपीए बंदर, वाढवण बंदर आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत पोहोचणे अधिक सुलभ होईल. या प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील व्यापार, पर्यटन आणि आर्थिक विकासाला मोठी चालना मिळणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

News Title: Maharashtra Expressway Update: Shaktipeeth Expressway to Connect with Kalyan–Latur Jan Kalyan Expressway

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now