Ajit Pawar Death | महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाचं नेतृत्व आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार (Ajit Pawar) यांच्या अकाली निधनामुळे राज्यभर शोककळा पसरली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने आज, २८ जानेवारी २०२६ रोजी संपूर्ण राज्यात शासकीय सुट्टी आणि राजकीय दुखवटा जाहीर केला असून, तीन दिवसांचा शासकीय दुखवटा पाळण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ( political mourning rules)
शासन निर्णयानुसार काय बंद राहणार :
राज्यपालांच्या निर्देशानुसार सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भातील अधिकृत शासन निर्णय (GR – Government Resolution) जारी केला आहे. या आदेशानुसार आज राज्यातील सर्व शासकीय तसेच निमशासकीय कार्यालये पूर्णपणे बंद राहणार आहेत. मंत्रालय, जिल्हाधिकारी कार्यालये, विविध सरकारी विभागांची कार्यालये यांचा यात समावेश आहे. त्यामुळे आज सर्व प्रशासकीय कामकाज स्थगित ठेवण्यात आले आहे. (government holiday today)
यासोबतच राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्थांनाही आज सुट्टी देण्यात आली आहे. तसेच, शासनातर्फे आयोजित करण्यात आलेले सर्व सांस्कृतिक, मनोरंजनात्मक किंवा सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. याशिवाय, राज्यातील सर्व सरकारी इमारतींवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्यात येणार असून, हा राष्ट्रीय शोक व्यक्त करण्याचा अधिकृत संकेत मानला जातो.
Ajit Pawar Death | शासकीय दुखवटा म्हणजे काय आणि नियम कोणते :
एखाद्या मोठ्या नेत्याच्या किंवा महत्त्वाच्या पदाधिकाऱ्याच्या निधनानंतर त्यांच्या सन्मानार्थ सरकारकडून राजकीय किंवा शासकीय दुखवटा जाहीर केला जातो. या कालावधीत ठरावीक शासकीय प्रोटोकॉल पाळले जातात. मंत्रालय, विधानभवन, जिल्हाधिकारी कार्यालय यांसारख्या ठिकाणी नियमितपणे फडकणारा राष्ट्रध्वज अर्ध्यावर ठेवला जातो, ज्यामुळे संपूर्ण देशभर शोकभावना व्यक्त केल्या जातात. (Ajit Pawar Death)
याच काळात सरकारकडून कोणतेही उत्सव, सोहळे किंवा मनोरंजनाचे कार्यक्रम घेतले जात नाहीत. आधीच नियोजित कार्यक्रम असल्यास ते रद्द केले जातात किंवा पुढे ढकलले जातात. याशिवाय, विदेशी मान्यवरांचे अधिकृत स्वागत, मेजवानी किंवा समारंभ टाळले जातात. संबंधित नेत्यावर राजकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतात, ज्यात पोलिसांकडून सलामी दिली जाते, तसेच महत्त्वाच्या सरकारी कार्यालयांमध्ये त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली जाते.






