Maharashtra Cabinet Reshuffle | महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar death) यांच्या निधनानंतर राज्य मंत्रिमंडळातील सत्तासंतुलन, महत्त्वाची खाती आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. रिक्त झालेली खाती, संभाव्य कॅबिनेट फेरबदल आणि पुढील राजकीय दिशा यावर राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
येत्या काही आठवड्यांत मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता असून, या बदलांचा केंद्रबिंदू मुंबईतील सत्ताकेंद्रात असणार आहे. अजित पवार यांच्याकडे असलेली अर्थ, नियोजन आणि राज्य उत्पादन शुल्क ही महत्त्वाची खाती तसेच क्रीडा व युवक कल्याण आणि अल्पसंख्याक विकास ही अतिरिक्त खाती सध्या रिक्त झाली आहेत. (Maharashtra Cabinet Reshuffle)
एनसीपीचा सर्व खात्यांवर दावा :
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील जवळपास सर्वच नेत्यांची भूमिका आहे की अजित पवार यांच्याकडे असलेली सर्व खाती पक्षाकडेच राहावीत. माहितीनुसार, भाजप आणि शिंदे शिवसेनाही या मागणीवर सकारात्मक असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे आधी एनसीपी अंतर्गत पातळीवर कोणत्या नेत्याला कोणते खाते द्यायचे, यावर चर्चा करून निर्णय घेतला जाईल आणि त्यानंतर महायुती सरकारकडून कॅबिनेट फेरबदल औपचारिकरित्या जाहीर केले जातील, असे सांगितले जात आहे.
यामुळे मंत्रिमंडळातील बदल केवळ नावापुरते न राहता, आगामी राजकीय समीकरणांवरही परिणाम करणारे ठरू शकतात. विशेषतः अर्थसारख्या महत्त्वाच्या खात्याबाबत कोणाला जबाबदारी मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Maharashtra Cabinet Reshuffle | नेतृत्व, उपमुख्यमंत्रीपद आणि विलिनीकरणावर चर्चा :
दरम्यान, अजित पवार (Ajit Pawar death) यांच्या निधनानंतर एनसीपीच्या नेतृत्वाबाबतही अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. पक्षाचा पुढील अध्यक्ष कोण होणार, उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी कोणाकडे सोपवली जाणार, तसेच बारामतीचा राजकीय वारसा कोण सांभाळणार, यावर चर्चा रंगल्या आहेत. (Maharashtra Cabinet Reshuffle)
समोर आलेल्या माहितीनुसार, एनसीपीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक किमान 15 दिवसांनंतर बोलावण्यात येण्याची शक्यता असून, सूतकाचे 13 दिवस पूर्ण झाल्यानंतरच कोणताही निर्णय घेतला जाईल.






