Maharashtra l महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता अवघ्या काही दिवसांत लागण्याची दाट लागण्याची शक्यता आहे. मात्र अशातच आता राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत आज अनेक मोठं मोठ्या निर्णयांची घोषणा केली आहे. कित्येक काळापासून ब्राह्मण समाजाची, परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणी होत होती, मात्र आता आज कॅबिनेटने मंजुरी दिली आहे. यासोबतच अनेक मोठे निर्णय घेतले आहेत.
Maharashtra l मंत्रिमंडळाने घेतले महत्वाचे निर्णय :
1.पुण्यातील लोहगाव विमानतळाचे नाव जगद्गुरु संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ पुणे असं करण्याला मंजुरी.
2.बालगृहे निरीक्षणगृहातील कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना लागू होणार: शिक्षकांना वरिष्ठ निवड श्रेणी (महिला व बाल विकास)
3.धान उत्पादकांना गुड न्यूज: आता प्रतिक्विंटल चाळीस रुपये अतिरिक्त भरडाई दर (अन्न नागरी पुरवठा) मिळणार.
4.कुणबीच्या तीन पोटजातींचा इतर मागासवर्ग यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे. (इतर मागास बहुजन कल्याण)
5. जुन्नर येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय मंजूर (विधी व न्याय)
6. शिरूर ते छत्रपती संभाजीनगर ग्रीनफिल्ड द्रुतगती मार्ग प्रकल्पाला मंजुरी. (सार्वजनिक बांधकाम)
7. करदात्यांचे हित लक्षात घेऊन GST अधिनियमात सुधारणा (वित्त)
9. यवतमाळ व जळगांव जिल्ह्यातील सूतगिरणींना थकबाकी परतफेडीसाठी हप्त्यांची सुविधा मिळणार. (वस्त्रोद्योग)
10. क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यांना सुसज्ज क्रीडा सुविधा उभारण्यासाठी वांद्रेतला भूखंड देणार. (महसूल)
11. ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी पदांचे एकत्रीकरण करून ग्रामपंचायत अधिकारी पद केले. (ग्राम विकास)
12. राज्यातील सरपंच उपसरपंच यांच्या मानधनात दुप्पट वाढ करण्यात आली. (ग्रामविकास)
13. मुंबई उच्च न्यायालयाच्या वांद्रे या ठिकाणावरील नव्या संकुलाचे बांधकाम राज्याचा महत्त्वपूर्ण प्रकल्प मंजूर.
(सार्वजनिक बांधकाम)
14. हरित हायड्रोजन धोरणात अँकर युनिटची पारदर्शकपणे निवड करण्यात येणार. (ऊर्जा)
15. ST महामंडळाच्या जमिनी बीओटी तत्वावर विकसित करणार : तब्बल 60 वर्षाचा भाडेपट्टा करार
(परिवहन)
16. ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ करणार. ( नियोजन)
17. राजपूत समाजासाठी वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ करणार. (नियोजन)
18. राज्यातील 14 ITI संस्थांचे नामकरण केले. (कौशल्य विकास)
19. छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथील विधी विद्यापीठांना तब्बल 7 कोटी रूपये मंजूर. (उच्च व तंत्रशिक्षण)
20. अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना थेट नियुक्ती देण्याच्या निर्णयात सुधारणा करण्यात आल्या. (क्रीडा)
21. जलसंपदा कर्मचाऱ्यांना वरिष्ठ वेतनश्रेणी (जलसंपदा)
22. श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथील शेती महामंडळाच्या जमिनी मुळ मालकांना परत करणार (महसूल)
23.लवकरच दूध अनुदान योजना सुरु राहणार. (दूग्ध व्यवसाय विकास)
24. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण जाहीर करण्यात आलं आहे. ( सांस्कृतिक कार्य विभाग)
News Title : Maharashtra Cabinet Decision
महत्वाच्या बातम्या-
PM किसान योजनेचा 18 वा हप्ता कधी जमा होणार? महत्वाची माहिती समोर
नवऱ्याचा लटकलेला मृतदेह, पत्नीची खाली हळदी-कुंकवाने पूजाअर्चा; इथं घडली धक्कादायक घटना
आनंदाची बातमी! राज्यातील लाडक्या बहिणींना ‘या’ दिवशी मिळणार तिसरा हप्ता
रोहित शर्माची भर मैदानात जादू?, बेल्स फिरवल्या मग मंत्रही फुंकला; पाहा Video






