सर्वात मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल ‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त; अजित पवारांची मोठी घोषणा

Maharashtra Budget Session 2024 | राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात त्यांनी वाहन चालकांना मोठा दिलासा दिलाय. आज अजित पवारांनी इंधन दरात घट करण्यात आल्याची घोषणा केली.

आज सादर केलेल्या अतिरिक्त अर्थसंकल्पात पेट्रोल आणि डिझेल वरील मुल्यवर्धित कर राज्यभरात समान करण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक तसेच उद्योग आणि व्यापार क्षेत्राला मोठा दिलासा मिळाला आहे.

पेट्रोल 65 पैसे आणि डिझेल 2 रुपयांनी स्वस्त

पेट्रोल आणि डिझेलवरील मुल्यवर्धित कर राज्यभरात समान करण्याच्यादृष्टीने बृहन्मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई या महानगरपालिका क्षेत्रातील डिझेलवरील सध्याचा कर 24 टक्क्यांवरुन 21 टक्के करण्यात आलाय.

यामुळे ठाणे, बृहन्मुंबई आणि नवी मुंबई या महानगरपालिका क्षेत्रातील पेट्रोलचा दर अंदाजे 65 पैसे आणि डिझेलचा दर अंदाजे 2 रुपये 7 पैसे प्रति लिटर स्वस्त होण्याची शक्यता आहे. सर्वसामान्य नागरिकांना तसेच उद्योग केंद्रांना दिलासा मिळावा म्हणून राज्यभर पेट्रोल-डिझेलवरील मुल्यवर्धित कर राज्यभरात समान करण्याची तरतूद केली (Maharashtra Budget Session 2024 ) असल्याची माहिती अजित पवार यांनी दिलीये.

‘या’ दलातील जवानांना व्यवसाय करातून सूट

याचबरोबर या अर्थसंकल्पात पाच केंद्रीय सशस्त्र दलातील जवानांना व्यवसाय करातून सूट देण्यात आल्याची देखील घोषणा करण्यात आलीये. केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील आसाम रायफल्स, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, भारत-तिबेट सीमा पोलीस दल, राष्ट्रीय सुरक्षा रक्षक व सशस्त्र सीमा दल यातील राष्ट्रीय कर्तव्य बजावणाऱ्या सशस्त्र जवानांना व्यवसाय कर भरण्यापासून सूट मिळाली आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीपूर्वीचा शेवटचा अर्थसंकल्प आज (28 जुन) अर्थमंत्री अजित पवारांनी मांडला. यामध्ये शेतकरी वर्ग, महिला वर्ग, तरुण तसेच इतर घटकांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या. महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेची घोषणा करण्यात आली तर शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पीक विमा योजना (Maharashtra Budget Session 2024 ) कायम ठेवण्यात आली आहे.

News Title – Maharashtra Budget Session 2024 Big Announcement About Petrol Diesel Price

महत्त्वाच्या बातम्या-

राज्याच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा; वाचा सविस्तर

गुड न्यूज! महिलांना दर महिन्याला मिळणार ‘इतके’ रुपये; शिंदे सरकारची मोठी घोषणा

मोठी बातमी ! चित्रा वाघ, माधवी नाईक ते रावसाहेब दानवे…, विधानपरिषदेसाठी भाजपची यादी समोर

पुणे पोर्शे अपघात प्रकरणी विरोधकांनी फडणविसांना घेरलं; सभागृहात जोरदार खडाजंगी

चाहत्यांना धक्का! अभिनेत्री हिना खानला झाला ‘हा’ कॅन्सर