Maharashtra l राज्यभर विधानसभा निवडणुकीची तयारी करण्यात सर्वच राजकीय पक्ष दंग आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी मोठे आव्हाने घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. अशातच आगामी विधानासभेच्या अनुषंगाने भाजपने एक जबरदस्त मेगा प्लॅन तयार केला आहे. भाजपने विधानसभा निवडणुकीची जबाबदारी चार दिग्गज नेत्यांवर सोपवली आहे.
लवकरच 20 स्टार प्रचारकांची व्यवस्थापन समिती जाहीर होणार :
आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि रावसाहेब दानवे या चतुर्भुजांवर सोपवली जाणार आहे. दरम्यान येत्या आठवड्याभरात 20 स्टार प्रचारकांची व्यवस्थापन समिती देखील जाहीर होणार आहे. या निवडणूक व्यवस्थापन समितीचे रावसाहेब दानवे पाटील हे प्रमुख संयोजक असणार असल्याची माहिती मिळाली आहे.
याशिवाय अशोक चव्हाण, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, नारायण राणे, रवींद्र चव्हाण, पंकजा मुंडे, विजया रहाटकर, प्रवीण दरेकर, राधाकृष्ण विखे पाटील, भाई गिरकर, अतुल सावे, संजय कुटे, जयकुमार रावल, रक्षा खडसे, अशोक नेते, मुरलीधर मोहोळ यांचा देखील या समितीत समावेश असणार आहे. तर दुसरीकडे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे यंदाच्या निवडणुकीत विशेष प्रचारक म्हणून एक महिना संपूर्ण महाराष्ट्र पालथा घालणार असल्याचे देखील बोलले जात आहे.
Maharashtra l नितीन गडकरी महाराष्ट्र दौरा करणार :
अगदी काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या देशातील सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या निकालांनी देश आणि राज्य पातळीवर भाजप पक्षाला चांगलाच धक्का दिला आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपची मोठी पिछेहाट झाल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे नितीन गडकरी महाराष्ट्र दौरा करणार आहेत.
अशातच राज्यातील एकूण 48 लोकसभा मतदारसंघांपैकी भाजपप्रणित महायुतीला अवघ्या 17 जागांवर विजय मिळवता आला आहे. तर महाविकास आघाडीने तब्बल 30 जागांवर विजय मिळवला आहे. या निकालांनी महायुती आणि भाजपचे सर्वच नेते प्रचंड अस्वस्थ झाले आहेत. या सर्व गोष्टींचा विचार करूनच भाजपने येत्या विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी केल्याचे दिसून येत आहे.
News Title – Maharashtra BJP Vidhansabha Election
महत्त्वाच्या बातम्या-
रामदास कदम यांना घरातूनच मिळणार मोठा झटका!
पिवळ्या दातामुळे चारचौघांत होतंय हसू?, लगेच ‘हा’ उपाय करा, हिऱ्यासारखी येईल चमक
अदानींना लागणार जवळपास 60 हजार कोटींची लॅाटरी
“जो हिंदू हित की बात करेगा, वही देश पर राज करेगा”; धर्मवीर-2 ची रिलीज डेट समोर
पुढील 24 तास धोक्याचे, IMD कडून ‘या’ जिल्ह्यांसाठी महत्वाचा इशारा






