विधानसभा निवडणुकीत भाजप किती जागा लढवणार? जाणून घ्या महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला

On: June 24, 2024 7:50 AM
Vidhansabha Election 2024
---Advertisement---

Vidhansabha Election l लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीचा पराभव झाल्यानंतर आता महायुतीने विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. महायुतीतील पक्षांमध्ये निवडणूक लढवण्यासाठी जागावाटपाबाबत चर्चा सुरु झाल्याची माहिती समोर आली आहे. भाजपने महायुतीत जास्तीत जास्त जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी सुरु केली आहे.

विधानसभा निवडणुकीत भाजप सर्वाधिक जागा लढवणार :

मिळालेल्या माहितीनुसार, भाजप राज्यातील 288 पैकी 155 जागांवर निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे.
शिंदे गटाची शिवसेना आणि अजित पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस भाजपच्या या निर्णयाला सहमती देणार का? हे भविष्यात स्पष्ट होईल. मात्र विधानसभा निवडणुकीत भाजपने सर्वाधिक जागांवर दावा केला आहे. यावेळी भाजप तब्बल 155 जागांवर निवडणूक लढवणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना 60 ते 65 जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 50 ते 55 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर महायुतीतल्या 3 मित्र पक्षांना 15 जागा सोडण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा आहे.

Vidhansabha Election l जागावाटपावर अंबादास दानवे काय म्हणाले :

महायुतीच्या जागावाटपाच्या फॉर्मुल्यावर ठाकरे गटनेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, माझ्या माहितीनुसार अजित पवार यांच्या गटाची बैठक झाली आहे. अद्याप जागावाटप झालेले नाही. तसेच अजित पवार गटातील निम्म्याने महाआघाडीसोबत जाण्यास नकार दिल्याचे मला माहीत आहे.

तर काही दिवसांपूर्वी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी 80 ते 90 जागांची मागणी केली होती, तर शिंदे गटाचे रामदास कदम किमान 100 जागांसाठी आग्रही आहेत. याबाबत पक्षांमध्ये अद्याप एकमत झालेले नाही. नुकतेच छगन भुजबळ यांना राज्यसभा निवडणुकीत उमेदवार न दिल्याने नाराजी व्यक्त केली होती.

News Title – Maharashtra Assembly Election 2024 Bjp Planning For Claim On 155 Seat In Mahayuti

महत्त्वाच्या बातम्या

या राशीच्या व्यक्तींच्या संपत्तीमध्ये वाढ होईल

“आदित्य ठाकरे वरळीत उभे राहणार की दुसरा मतदारसंघ शोधणार?”

आमदाराच्या पुतण्याबाबत महत्त्वाची माहिती समोर!

पुणे हादरलं! 13 वर्षीय मुलीवर वडील, चुलता आणि भावाकडून बलात्कार

‘अटल सेतू’ प्रकल्पाबाबत महत्त्वाची अपडेट समोर!

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now