धक्कादायक! शेकडो गायींचे जंगलात आढळले मृतदेह; मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय

On: February 20, 2024 5:36 AM
Madhya Pradesh
---Advertisement---

Madhya Pradesh | जंगलात शेकडो गायींचे मृतदेह आढळल्याने एकच खळबळ माजली. मध्य प्रदेशातील शिवपुरीमध्ये एक धक्कादायक दृश्य पाहायला मिळाले आहे. येथील करैरा परिसरातील सिल्लारपूर गावात शेकडो गायींचे मृतदेह जंगलात पडलेले आढळून आले. यातील काही गायी जिवंत आहेत. शिवपुरी-झाशी महामार्गापासून अवघ्या 500 मीटर अंतरावर असलेल्या आरक्षित वनजमिनीवर या गायी पडून आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात मृत गायी पाहून गावकऱ्यांना धक्का बसला.

एवढ्या मोठ्या प्रमाणात गायी कुठून आल्या? त्यांचा मृत्यू कसा झाला? याचा शोध पोलीस घेत आहेत. या गायी शहरी भागातून डंपरमध्ये आणून रात्रीच्या वेळी गावात टाकल्याचा संशय आहे. उत्तर प्रदेशातील झाशी जिल्हा इथून जवळ आहे, त्यामुळे या गायी तेथून आणल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

गायींचे जंगलात आढळले मृतदेह

सिल्लारापूर गावचे सरपंच अरविंद लोधी यांनी सांगितले की, घटनास्थळी 400-500 गायी पडल्या आहेत. याबाबत माहिती देऊनही प्रशासनाने दखल घेतली नाही. मात्र, या गायी कुठून आणल्या आहेत, याची माहिती मिळाली नसल्याचे त्यांनी सांगितले. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीपूर्वी मंत्र्यांशी झालेल्या चर्चेत राज्यातील माता गायींच्या सन्मानासाठी लवकरच काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले.

ते म्हणाले की, पावसाळ्यात अनेकदा प्रमुख रस्ते आणि महामार्गावर गायींचा अपघात झाल्याच्या बातम्या येत असतात. अनेक वेळा गायी या अपघातांना बळी पडून मृत्यूमुखी पडतात, त्यामुळे गायी रस्त्यांवर फिरू नयेत आणि त्यांना सुरक्षित ठिकाणी राहण्याची सोय व्हावी, अशी यंत्रणा आवश्यक आहे.

Madhya Pradesh सरकारचा मोठा निर्णय

याशिवाय गायींना आश्रय मिळावा यासाठी निधी दिला जाणार आहे. तसेच गाईंच्या आश्रयस्थानांसाठी निधी वाढवण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. उत्कृष्ट व्यवस्थापनासह, गायींच्या सन्मानार्थ, त्यांच्या रक्षणासाठी आवश्यक व्यवस्था सुनिश्चित केली जाईल. गाय मरण पावली तर तिच्या अंत्यसंस्काराची व्यवस्था करावी. याबाबत ग्रामपंचायत, नगरपरिषद व महानगरपालिका यांना सूचना देण्यात आल्या आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

दरम्यान, या महिन्यात पशुसंवर्धन विभागामार्फत बैठक आयोजित करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. यासंबंधितील बैठकांमध्ये शहरांचे महापौर आणि नागरी संस्थांशी संबंधित अधिकारी आणि इतर लोकप्रतिनिधींनाही सहभागी करून घ्यावे, असेही ते म्हणाले. या बैठकीत गोशाळेचे अधिक चांगले संचालन, पोलिसांचे सहकार्य आणि केंद्र सरकारकडून पायाभूत सुविधांच्या कामांसाठी निधी मिळवण्याबाबत देखील चर्चा झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

News Title- Chief Minister Mohan Yadav took a big decision after the bodies of hundreds of cows were found in the forests of Madhya Pradesh
महत्त्वाच्या बातम्या –

क्रिकेटपटू Ravichandran Ashwin च्या पत्नीचा मोठा खुलासा! म्हणाली..

रणबीर कपूरचा ऐश्वर्या रायबद्दल धक्कादायक खुलासा, म्हणाला…

राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्यात चर्चा, राजकीय वर्तळात चर्चांना उधाण

शिवनेरी किल्ल्यावरून मुख्यमंत्र्यांचं मराठा आरक्षणाबाबत मोठं वक्तव्य!

शिवजयंतीदिवशी अभिनेता रितेश देशमुखची सर्वांत मोठी घोषणा!

Join WhatsApp Group

Join Now