‘मी त्या जातीतली…’; मराठी सिनेसृष्टीबाबत माधुरी पवारने केला धक्कादायक खुलासा

On: June 21, 2024 7:03 PM
Madhuri Pawar
---Advertisement---

Madhuri Pawar | अभिनेत्री माधुरी पवार हिने नुकतंच तिच्या एका मुलाखतीमध्ये सिनेसृष्टीत होणाऱ्या राजकारणावर भाष्य केलं आहे. तिने मराठी सिनेसृष्टीबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. मराठी सिनेसृष्टीत होणाऱ्या वर्णभेद आणि जातीभेदाविषयी माधुरी पवार (Madhuri Pawar) स्पष्टपणे बोलली आहे.

आजही रंगामुळे माझ्याकडून अनेक रोल्स हिसकावून घेतले जातात, असा गौप्यस्फोट माधुरी पवारने (Madhuri Pawar) केला आहे. माधुरीच्या या वक्तव्याची सध्या चर्चा रंगली आहे. ती एका मुलाखतीत बोलत होती.

माधुरी पवारने केला धक्कादायक खुलासा

एखादी अभिनेत्री आपल्याला दिसली की असं वाटतं की अरे किती छान आहे, सुंदर आहे, गोरीपान आहे किंवा खूप छान फॅमिली बॅकग्राऊंडमधून आलीये, तिचा एक क्लास आहे. या या जातीकुळातली आहे हे सुद्धा बघितलं जातं, असं (Madhuri Pawar) माधुरीने सांगितलं.

आज जे काही सिनेसृष्टीत काम करते, खूप काही रोल्स माझ्याकडून जातात. जातात म्हणण्यापेक्षा ते हिसकावून घेतले जातात. काहींना ते देण्याची इच्छा होत नाही, कारण मी सावळी आहे किंवा मी त्या जातीवर्गातून नाही, असंही तिने सांगितलं.

Madhuri Pawar | “मी गोरी असते तर किती भारी झालं असतं”

लहानपणी असं व्हायचं की, अरे ही गोरी नाहीये, हिची स्किन तुकतकीत नाहीये, ही पत्र्याच्या घरा राहते. यामुळे कधीकधी चांगल्या वर्गातली मुलं, मुली मला त्यांच्यात सामावून घ्यायची नाहीत आणि मी घरी पण आईला बऱ्याचदा विचारायचे की मी अशी खूप गोरी का नाहीये ग, मी गोरी असते तर किती भारी झालं असतं, असं माधुरी पवारने (Madhuri Pawar) म्हटलं.

दरम्यान, माधुरी पवार (Madhuri Pawar) हिने आपल्या अभिनयामुळे आणि तिच्या नृत्य शैलीमुळे मराठी सिनेसृष्टीत एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील तिच्या भूमिकेला विशेष पसंती मिळाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Madhuri Pawar (@madhuripawarofficial)

महत्त्वाच्या बातम्या- 

HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी सर्वात मोठी बातमी!

हवामान विभागाचा मोठा इशारा ; ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता

ओबीसींच्या शिष्टमंडळात कोण?, महत्त्वाची माहिती आली समोर

“मला लग्नव्यवस्था पटत नाही, त्यापेक्षा लिव्ह इन…”, सैराटफेम तानाजीचं मोठं वक्तव्य

राज्यातील पोलीस भरतीबाबत देवेंद्र फडणवीस यांची सर्वात मोठी घोषणा!

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now