LPG Cylinder Price Cut | नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सर्वसामान्य नागरिकांसाठी दिलासादायक बातमी समोर येण्याची शक्यता आहे. 1 जानेवारी 2026 पासून गॅसच्या किमतीत बदल होण्याची चर्चा जोर धरू लागली असून, घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात कपात होऊ शकते. दर महिन्याच्या पहिल्या तारखेला तेल आणि गॅसच्या किमतींचा आढावा घेतला जातो, त्यामुळे नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांना आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (LPG Cylinder Price Cut)
1 डिसेंबर 2025 रोजी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती 10 रुपयांनी कमी करण्यात आल्या होत्या. मात्र, घरगुती वापराच्या एलपीजी सिलेंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आला नव्हता. आता सीएनजी आणि पीएनजीच्या दरात कपात जाहीर झाल्यानंतर, एलपीजी सिलेंडरच्या दरातही घट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
CNG-PNG दर कपातीनंतर LPG बाबत आशा :
सरकारने 1 जानेवारी 2026 पासून सीएनजी आणि पीएनजीच्या किमती प्रति युनिट 2 ते 3 रुपयांनी कमी करण्याची घोषणा केली आहे. वाहनांसाठी वापरल्या जाणाऱ्या सीएनजी आणि घरगुती पाईप गॅस असलेल्या पीएनजीच्या दरात कपात झाल्यानंतर, आता घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीतही बदल होण्याची शक्यता आहे. यामुळे महागाईने त्रस्त असलेल्या सर्वसामान्य कुटुंबांना मोठा दिलासा मिळू शकतो.
सध्या 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमती मार्च 2024 पासून स्थिर आहेत. दिल्लीमध्ये विनाअनुदानित सिलेंडरची किंमत 803 रुपये आहे, तर मुंबईत 852.50 रुपये इतकी आहे. कोलकातामध्ये हा दर 879 रुपये असून चेन्नईत 868.50 रुपये आहे. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना वर्षाला नऊ सिलेंडरसाठी 300 रुपयांची सबसिडी मिळते.
LPG Cylinder Price Cut | कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घट :
अलीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत लक्षणीय घट झाली आहे. सध्या ब्रेंट क्रूड सुमारे 60 डॉलर प्रति बॅरलच्या आसपास व्यवहार करत आहे, जे गेल्या काही वर्षांतील नीचांकी पातळी मानली जात आहे. वाढता पुरवठा आणि स्थिर मागणी यामुळे कच्च्या तेलाच्या किमतींवर दबाव आला आहे. (Gas Price January 2026)
कच्च्या तेलापासून पेट्रोल, डिझेलसह (Petrol) एलपीजीसारखी उत्पादने तयार केली जातात. कच्च्या तेलाच्या शुद्धीकरणामुळे रिफायनरी कंपन्यांचा नफा सुधारला असून, त्याचा फायदा ग्राहकांना देण्याची क्षमता कंपन्यांकडे आहे. त्यामुळे 1 जानेवारीपासून घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमती कमी होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.






