भुशी डॅम दुर्घटनेनंतर प्रशासनाची सर्वात मोठी कारवाई!

Lonavala Bhushi Dam | लोणावळ्यात अनेक जोडपे, कुटुंब, तसेच विवाह झालेले जोडपे या ठिकाणी येतात. येथील निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेताना दिसतात. लोणावळ्यात सर्वाधिक प्रसिद्ध असलेली जागा म्हणजे भुशी डॅम (Lonavala Bhushi Dam) आहे. मात्र दोन दिवसांआधी भुशी डॅम (Lonavala Bhushi Dam) येथे एकाच कुटुंबातील पाच जाणांचा डॅममध्ये वाहून गेल्याने मृत्यू झाला आहे. अन्सारी कुटुंब या धबधब्याखाली वाहून गेले आहे. ते सहलीचा आनंद घेण्यासाठी आले होते.

भुशी डॅममध्ये अंन्सारी कुटुंब गेलं वाहून

साहिस्ता लियाकत अन्सारी (36),मारिया अन्सारी (9), मिमा सलमान उर्फ आदिल अन्सारी (13),आदिल अन्सारी (8), अदनान अन्सारी (4), हे वाहून गेले. या घटनेने पर्यटकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. यामुळे आता याप्रकरणावर मोठी पाऊलं उचलण्यात आली आहे.

लोणावळ्यातील भुशी डॅम (Lonavala Bhushi Dam) येथील अतिक्रमण काढण्यासाठी प्रशासनाने पाऊल उचललं आहे. लोणावळा नगरपरिषद आणि पुणे रेल मंडळ प्रशासनाकडून संयुक्त अतिक्रमण कारवाई सुरू आहे. भुशी धरण (Lonavala Bhushi Dam) परिसरात चहा, नाश्ता, फेरीवाले कणीस विक्रेते यांनी दुकाने थाटली. त्यामुळे रेल्वेप्रशासनाने कारवाईचा बडगा उचलला आहे.

भुशी डॅम कोणाचं?

भुशी डॅम हे रेल्वे मालकीचं असल्याने त्यांनी स्थानिक प्रशासनाची मदत घेतली असल्याची माहिती समोर आली आहे. पर्यटक पावसाळ्यात भुशी धरण परिसराला पसंती देतात. मात्र याठिकाणी अतिक्रमणामुळे मोठी दाटी होताना दिसत आहे. दोन दिवसांपूर्वी घडलेल्या प्रशासनाला जाग आली आहे.

सध्या पावसाचं वातावरण आहे. या हंगामात पर्यटक हिरवा निसर्गरम्य वातावरणात आपला आनंद शोधण्यासाठी जाताना दिसतात. त्यातल्या त्यात धबधब्यांखाली मनमुरादपणे आनंद लुटतात. आठवडाभर कामातील शिण घालवण्यासाठी ते आपल्या कुटुंबाला सोबत घेत जात असतात. मात्र आनंद लुटत असताना अशा काही घटना घडतील ज्याने आनंदाचं रूपांतर हे दुखात व्हायला फार वेळ लागत नाही.

News Title – Lonavala Bushi Dam News Update After Accident Of Ansari Family

महत्त्वाच्या बातम्या

सलमानला मारण्यासाठी तब्बल ‘एवढ्या’ लाखांची सुपारी; धक्कादायक माहिती समोर

महाराष्ट्र विधान परिषदेचा अध्यक्ष कोण होणार? ‘या’ तीन भाजप नेत्यांची नावे शर्यतीत

पंकजा मुंडेंना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया

राहुल गांधींनी संसदेत भगवान शंकराचा फोटो का दाखवला? काय आहे यामागचं कारण

बॉयफ्रेंडने लग्नाला नकार दिल्याने गर्लफ्रेंडने केलं धक्कादायक कृत्य