Lok Sabha Session l लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जूनला जाहीर झाल्यानंतर देशात सलग तिसऱ्यांदा एनडीएच सरकार स्थापन झालं आहे. त्यानंतर 9 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली आहे. अशातच आता आजपासून 18 व्या लोकसभेच्या पहिल्या संसदीय अधिवेशनाला सुरुवात होत आहे.
18 व्या लोकसभेच्या पहिल्या संसदीय अधिवेशनाला सुरुवात :
आजपासून लोकसभेच्या संसदीय अधिवेशनाला सुरवात होत आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी व कॅबिनेट मंत्री यांच्यासह तब्बल 280 खासदार शपथ घेणार आहेत. तसेच आज खासदारांचा शपथविधी सोहळा देखील पार पडणार आहे. आज सकाळी 11 वाजता लोकसभेच्या कामकाजाला देखील सुरुवात होणार आहे.
लोकसभा संसदीय अधिवेशनावेळी आज सकाळी 11 ते 1 या वेळेत शपथविधी सोहळा पार पडणार आहे. तसेच उरलेल्या 29 खासदारांचा शपथविधी मंगळवारी सकाळी 11 ते 12 या वेळेत पार पडणार आहे. या खासदारांना शपथ देण्याचं काम प्रोटेम स्पीकर इतर सदस्यांना करणार आहेत. तर अधिवेशनादरम्यान लोकसभा अध्यक्षांची निवड देखील 26 जून रोजी होणार असून 27 जून रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करणार आहेत.
Lok Sabha Session l सर्वात आधी राजनाथ सिंह शपथ घेणार :
आज होणाऱ्या शपथविधि दरम्यान पॅनेल सदस्यांचा शपथविधी होणार आहे. या शपथविधीनंतर कॅबिनेट मंत्र्यांचा देखील शपथविधी सुरू होणार आहे. यावेळी सर्वात आधी शपथ राजनाथ सिंह घेणार आहेत. त्यानंतर अमित शहा, नितीन गडकरी, शिवराज सिंह चौहान आणि मनोहर लाल खट्टर यासह इतर कॅबिनेट मंत्री अनुक्रमे शपथ घेणार आहेत.
तसेच कॅबिनेट मंत्र्यांनंतर राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि त्यानंतर राज्यमंत्री देखील शपथ घेणार आहेत. मंत्र्यांच्या शपथेनंतर राज्यांचे खासदारांचा शपथविधी पार पडणार आहे. सर्वात आधी, अंदमान आणि निकोबारचे खासदार विष्णू पद रे यांना शपथ दिली जाणार आहे, त्यानंतर आंध्र प्रदेश, त्यानंतर अरुणाचल प्रदेश, आसाम, बिहार आणि इतर राज्यांच्या खासदारांना क्रमानुसार शपथ दिली जाणार आहे.
News Title – Lok Sabha Frist Session
महत्त्वाच्या बातम्या
सोनाक्षी-झहीरने ग्रँड रिसेप्शन पार्टीत केला रोमँटिक डान्स; व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
…तर रोहितसेना ऑस्ट्रेलियाचा वचपा काढणार? कांगारूंना दाखवणार घरचा रस्ता
विधानसभा निवडणुकीत भाजप किती जागा लढवणार? जाणून घ्या महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला






