Lok Sabha Election Result | संपूर्ण देशाला उत्सुकता लागून राहिलेल्या देशातील सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला (Lok Sabha Election Result) सुरुवात झाली आहे. सुरुवातीला टपाली मतांची मोजणी करण्यात आली. त्यानंतर ईव्हीएम यंत्रांमधील मतमोजणीला सुरुवात झाली आहे.
सांगलीत विशाल पाटील सुसाट
काँग्रेसचे बंडखोर आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील (Vishal Patil) यांनी प्रचंड मोठी आघाडी घेतली आहे. तर ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील या रेसमध्ये दिसेनासे झाले आहेत.
सांगलीत महाविकास आघाडीने विशाल पाटील (Vishal Patil) यांना उमेदवारी द्यावी, असा स्थानिक कार्यकर्त्यांचा आग्रह होता. मात्र, ही जागा ठाकरे गटाच्या वाट्याला आल्याने चंद्रहार पाटील यांना रिंगणात उतरवले गेले. यामुळे नाराज झालेल्या विशाल पाटील यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला होता.
एकूण 543 जागांपैकी 511 जागांचे कल हाती
मतमोजणीचे कल हे सातत्याने बदलत आहेत. देश आणि राज्य पातळीवरील आघाडी आणि पिछाडीचे आकडे वेगाने बदत आहेत. पहिल्या तासाभरात लोकसभेच्या एकूण 543 जागांपैकी 511 जागांचे कल हाती आले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
शेअर बाजारात मोठी उलथापालथ; निकालापूर्वीच मार्केट जोरदार आपटलं
बीडमध्ये तब्ब्ल ‘इतक्या’ फरकाने बजरंग सोनावणे आघाडीवर
मोठी गुड न्यूज! निकालापूर्वीच सोनं झालं स्वस्त; जाणून घ्या आजच्या किंमती






