राजकीय भूकंप! अजित पवारांचे शिलेदार ‘शरद पवार’ विजयी

On: December 21, 2025 2:35 PM
AJit Pawar
---Advertisement---

Loha Nagar Parishad Result 2025 | महाराष्ट्रातील नगरपरिषद निवडणुकांचे निकाल जाहीर होत असताना नांदेड जिल्ह्यातील लोहा नगरपरिषद निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने मोठा विजय मिळवत भाजपला जोरदार धक्का दिला आहे. अजित पवार गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शरद पवार यांनी भाजपचे माजी नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी यांचा पराभव करत लोहा नगरपरिषद आपल्या ताब्यात घेतली आहे. या निकालामुळे भाजपच्या बालेकिल्ल्यात भगदाड पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

लोहा नगरपरिषद निवडणूक ही केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक न राहता प्रतिष्ठेची लढाई बनली होती. भाजपकडून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांनी सभा घेत जोरदार प्रचार केला होता, तर राष्ट्रवादीकडून आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी पूर्ण ताकद पणाला लावली होती. मात्र मतदारांनी शेवटी अजित पवार गटाच्या बाजूने कौल दिल्याने भाजपला अनपेक्षित पराभव स्वीकारावा लागला.

शरद पवारांचा दणदणीत विजय, भाजपला मोठा धक्का :

लोहा नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी झालेल्या अटीतटीच्या लढतीत शरद पवार यांनी 10 हजार 191 मते मिळवत विजय मिळवला. भाजपचे उमेदवार गजानन सूर्यवंशी यांना 8 हजार 160 मतांवर समाधान मानावे लागले. तब्बल 2 हजार 821 मतांनी झालेला हा पराभव भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. विशेष म्हणजे शरद पवार हे याआधी भाजपचे तालुकाध्यक्ष होते. ऐन निवडणुकीच्या तोंडावर आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी त्यांना राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश देत उमेदवारी दिली आणि हा निर्णय निर्णायक ठरला. (Loha Nagar Parishad Result 2025)

या निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे एकूण 17 नगरसेवक विजयी झाले असून, लोहा नगरपरिषदेत पक्षाचे स्पष्ट वर्चस्व निर्माण झाले आहे. त्यामुळे लोह्यात राष्ट्रवादीची सत्ता स्थापन होणे निश्चित मानले जात आहे.

Loha Nagar Parishad Result 2025 | चिखलीकरांनी राखला बालेकिल्ला, प्रतिष्ठेची लढाई जिंकली :

लोहा हा आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा बालेकिल्ला मानला जातो. मागील निवडणुकीत ते भाजपमध्ये असताना त्यांनी नगरपरिषद जिंकली होती. राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केल्यानंतरही चिखलीकर यांनी आपला दबदबा कायम ठेवत पुन्हा एकदा विजय मिळवून दाखवला आहे. या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली होती. काँग्रेस उमेदवाराने ऐनवेळी माघार घेतल्यामुळे ही लढत थेट भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यात झाली आणि शेवटपर्यंत प्रचंड चुरस पाहायला मिळाली. (Loha Nagar Parishad Result 2025)

अखेर मतमोजणीअंती अजित पवार गटाच्या शरद पवारांचा विजय जाहीर होताच लोह्यात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. या निकालामुळे नांदेड जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसू लागली असून, भाजपसाठी हा निकाल मोठा इशारा मानला जात आहे.

News Title : Nanded Local Body Election Result 2025: Ajit Pawar’s NCP Wins Loha Nagar Parishad, BJP Suffers Major Setback

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now