महिलांसाठी LIC ची ‘ही’ योजना ठरतेय फायदेशीर; जाणून घ्या सविस्तर

On: May 27, 2026 7:07 PM
LIC Plans
---Advertisement---

LIC Vima Sakhi Scheme | भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विविध योजना राबवत असते. त्यापैकी ‘विमा सखी’ योजना (Vima Sakhi Scheme) ही विशेष चर्चेत आली आहे. या योजनेद्वारे महिलांना विमा क्षेत्रात काम करण्याची संधी मिळत असून त्यासोबतच मासिक आर्थिक सहाय्य आणि कमिशनद्वारे उत्पन्न कमावण्याची सुविधा दिली जात आहे.

दहावी उत्तीर्ण महिलांना मोठी संधी :

एलआयसी (LIC) ची ही योजना विशेषतः ग्रामीण आणि निमशहरी भागातील महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी महिलांचे वय 18 ते 70 वर्षांदरम्यान असणे आवश्यक आहे. तसेच अर्ज करणारी महिला किमान दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.

‘विमा सखी’ म्हणून निवड झाल्यानंतर महिलांना गावोगावी विमा योजनांबाबत जनजागृती करण्याचे आणि ग्राहकांना पॉलिसीविषयी माहिती देण्याचे काम करावे लागते. सुरुवातीच्या काळात महिलांना मासिक स्टायपेंड दिले जाते. पहिल्या वर्षात 7 हजार रुपये, दुसऱ्या वर्षात 6 हजार रुपये आणि तिसऱ्या वर्षात 5 हजार रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य मिळू शकते. याशिवाय विमा पॉलिसी विक्रीवर स्वतंत्र कमिशन देखील मिळते.

LIC Vima Sakhi Scheme | प्रशिक्षणानंतर पूर्णवेळ एजंटची संधी :

या योजनेत महिलांना विमा विक्री आणि ग्राहक मार्गदर्शनाचे मोफत प्रशिक्षण दिले जाते. एलआयसीकडून विमा नियम, विक्री कौशल्य आणि ग्राहकांशी संवाद यासंदर्भात विशेष मार्गदर्शन केले जाते. जर एखाद्या महिलेने दिलेले विक्रीचे उद्दिष्ट पूर्ण केले किंवा त्यापेक्षा जास्त कामगिरी केली तर तिला अतिरिक्त कमिशन मिळण्याचीही संधी असते.

तीन वर्षांचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर महिला पूर्णवेळ एलआयसी एजंट म्हणून काम करू शकतात. मात्र त्यासाठी पहिल्या वर्षात विकलेल्या पॉलिसींपैकी किमान 65 टक्के पॉलिसी सक्रिय राहणे आवश्यक आहे. या योजनेत महिलांना कामाचे स्वातंत्र्य दिले जाते. दरम्यान, एलआयसीचे विद्यमान कर्मचारी किंवा एजंट यांच्या नातेवाईकांना या योजनेसाठी अर्ज करता येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

News title : LIC Vima Sakhi Scheme

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now