LIC Amrit Bal Policy | आजच्या वाढत्या महागाईच्या काळात मुलांचे भविष्य सुरक्षित ठेवणे हे प्रत्येक पालकांसाठी मोठे आव्हान बनले आहे. शिक्षण, आरोग्य आणि पुढील करिअरसाठी मोठ्या निधीची गरज भासते. त्यामुळे अनेक पालक लहानपणापासूनच सुरक्षित गुंतवणूक योजना शोधत असतात. अशा वेळी भारतीय जीवन विमा महामंडळाची (LIC) अमृत बाल पॉलिसी ही मुलांसाठी उत्तम बचत व विमा संरक्षण देणारी योजना म्हणून पुढे आली आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यास मुलांच्या भविष्याकरिता मजबूत आर्थिक पाया तयार होतो. (LIC Amrit Bal Policy)
भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC ने ही योजना खास मुलांच्या गरजा लक्षात घेऊन तयार केली आहे. यात गुंतवणुकीसोबत जीवन विम्याचे संरक्षणही मिळते. पालक आपल्या मुलांच्या 30 दिवसांपेक्षा जास्त वयापासून ते कमाल 13 वर्षे वयापर्यंत ही पॉलिसी घेऊ शकतात. त्यामुळे कमी वयात गुंतवणूक सुरू करून मोठा फंड जमा करण्याची संधी मिळते.
LIC अमृत बाल पॉलिसी म्हणजे काय? :
LIC ची अमृत बाल पॉलिसी (LIC Amrit Bal Policy) ही नॉन-लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन आहे. म्हणजेच बाजारातील चढउतारांचा या पॉलिसीवर काहीही परिणाम होत नाही. त्यामुळे गुंतवणुकीला सुरक्षिततेची हमी मिळते. योजनेअंतर्गत किमान ₹2 लाख रकमेपासून गुंतवणूक करता येते, तसेच या योजनेत जास्तीत जास्त गुंतवणुकीची कोणतीही मर्यादा नाही.
योजनेची मॅच्युरिटी वय 18 वर्षांपासून 25 वर्षांदरम्यान ठेवता येते. त्यामुळे मुलगा किंवा मुलगी मोठी झाल्यावर, शिक्षण, परदेशात जाण्याची तयारी, करिअर किंवा लग्न यांसाठी मोठा फंड उपलब्ध होतो. या योजनेचा उद्देशच मुलांच्या भविष्यासाठी दीर्घकालीन आर्थिक सुरक्षा देणे हा आहे.
LIC Amrit Bal Policy | किती परतावा मिळतो? :
LIC अमृत बाल पॉलिसीमध्ये (LIC Amrit Bal Policy) प्रति ₹1,000 वर वार्षिक ₹80 परतावा मिळतो, मात्र यासाठी पॉलिसी सक्रीय असणे गरजेचे आहे. इतर पारंपरिक योजनांच्या तुलनेत हा परतावा समाधानकारक मानला जातो. या पॉलिसीमध्ये प्रीमियम कोठे आणि कसा भरायचा याबाबत लवचिकता उपलब्ध आहे. पालक मासिक, तिमाही, सहामाही किंवा वार्षिक असे चार पर्याय निवडू शकतात.
प्रीमियम रक्कम मुलाचे वय, निवडलेली रकम आणि योजना किती वर्षांची आहे यावर अवलंबून ठरते. त्यामुळे मुलांचे वय जितके लहान तितका प्रीमियम कमी होण्याची शक्यता अधिक असते. पालकांना भविष्यात एक सुरक्षित आणि मोठा फंड मिळावा यासाठी ही योजना विशेष उपयोगी ठरते.
मुलांच्या सुरक्षित भविष्याकरिता उपयुक्त योजना :
आजच्या भविष्यात अनिश्चितता वाढत असताना LIC च्या अमृत बाल पॉलिसीमुळे पालकांना दुहेरी फायदा मिळतो एकतर गुंतवणूक आणि त्याचबरोबर जीवन विम्याचे संरक्षण. अचानक उद्भवणाऱ्या परिस्थितीत मुलाचे संरक्षण आणि त्याच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यास ही योजना मदत करते.
LIC सारख्या विश्वसनीय संस्थेची हमी आणि बाजारातील जोखमीपासून पूर्ण संरक्षण हे या योजनांचे मुख्य आकर्षण आहे. दीर्घकालीन बचतीकडे वळणाऱ्या पालकांसाठी ही योजना निश्चितच लाभदायक पर्याय ठरते.






