पुण्याजवळच्या खेड, शिरूरमध्ये मानवी वस्तीत बिबट्याचा संचार, पाहा काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ

On: December 27, 2024 8:03 PM
Pune
---Advertisement---

Pune: वाढती लोकसंख्या व जंगली भागात मानवी आक्रमण यांमुळे वन्यप्राण्यांचा हक्काचा अधिवास दिवसेंदिवस नष्ट होत चालल्याने या प्राण्यांनी मानवी वस्तीकडे आपला मोर्चा वळविला आहे. परिणामी भक्ष्य व पाण्याच्या शोधार्थ भटकणारे बिबटे दिवसाढवळ्या नागरिकांच्या नजरेस पडत आहेत.

करंदी, पऱ्हाडवाडी परिसरात दर्शन

करंदी हद्दीतील झेंडे वस्ती व पऱ्हाडवाडी येथे सातत्याने नागरिकांना बिबट्या फिरताना आढळून येत आहे. करंदीतील झेंडे वस्तीवरील रुजीरंग ढोकले व राहुल ढोकले यांच्या घरासमोर दोन बिबटे जोडीने फिरताना आढळून आले. अगदी पाळीव प्राण्यांसारखे घरासमोर ठाण मांडून बिबटे बसत आहेत. अशा प्रकारांमुळे दिवसा सुद्धा शेतीची कामे करणे जिकीरीचे बनत चालले आहे. वनविभागाने या भागात बिबट्या पकडण्यासाठी पिंजरा बसविण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

Pune | पशुधनावर सातत्याने हल्ले

खेडसह शिरूर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील गावांमध्ये ऊस व मका पिकांचे मोठे क्षेत्र आहे. परिणामी या भागात बिबट्यासह कोल्हे, ससे, तरस, लांडगे, मोर, रानडुकरे आदी प्राण्यांचा मुक्तसंचार आहे. त्यातच बिबट्याचा लपण्याचा व खाण्याचा उदरनिर्वाह व्यवस्थित होत असल्याने ते बराच काळ एकाच ठिकाणी वास्तव्यास राहत आहेत. खेडमधील मरकळ, सोळू, गोलेगाव, संगमवाडी, कोयाळी-भानोबाची, मोहितेवाडी, काळूस, शेलपिंपळगाव, दौंडकरवाडी, चिंचोशी, साबळेवाडी, सिद्धेगव्हाण, रामनगर तर शिरूर तालुक्यातील वाजेवाडी, करंदी, केंदूर, पऱ्हाडवाडी आदी गावांत बिबट्याचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. परिणामी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

जुन्नर वनविभागाच्या अखत्यारीत असलेल्या गावांमध्ये अनेक बिबट्यांचे वास्तव्य आहे. वनातील बिबटे भक्ष्याच्या शोधार्थ मनुष्य वस्त्यांकडे फिरकू लागल्याने मागील काही वर्षांत पन्नासहून अधिक निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे. विशेषतः खेडसह शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील गावांमध्ये बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढलेला निदर्शनास येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

राज्यात पुढील २ दिवस पावसासह गारपिटीचा इशारा; ऑरेंज अलर्ट… पाहा कुठे कुठे आहे इशारा

क्रेडिट कार्ड वापरणारांसाठी महत्त्वाची माहिती, आत्ताच वाचा नाहीतर भरावा लागेल मोठा दंड

मुंबईकरांनो सावधान… प्रत्येक श्वासागणिक तुमच्या शरीरात चाललंय विष!, सगळी माहिती नीट वाचा

PMPML बसने प्रवास करणाऱ्या ‘त्या’ प्रवाशांसाठी खूशखबर, आता ही खास सुविधा मिळणार!

आता तुमच्या घराच्या जवळ मिळणार गंगाजल, तेही फक्त ३० रुपयांत!, कसं ते पाहा…

Krishna Varpe

Mahesh Patil

Join WhatsApp Group

Join Now