Laxman hake | ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी लक्ष्मण हाके काही दिवसांपुर्वी उपोषणाला बसले होते. राज्यात सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा खूपच गाजत आहे. कालच राज्य सरकारने मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर या संदर्भातील प्रश्नांवर
सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बहिष्कार टाकला.
आरक्षणाच्या मुद्यांवर विधानसभेत चर्चा करावी, ही काँग्रेसची मागणी सरकारने मान्य न केल्याने विरोधकांनी बैठकीवर बहिष्कार टाकला. दुसरीकडे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याचं म्हटलंय. याच पार्श्वभूमीवर आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman hake) यांनी थेट राज्य सरकारवर निशाणा साधत मोठा इशारा दिला आहे.
“ओबीसी समाजाला असंघटित समजू नका”
राज्य सरकारने सगेसोयरे अध्यादेश काढला तर आम्ही मुंबई जाम करुन टाकू, असा इशाराच लक्ष्मण हाके यांनी दिला आहे. मुंबईत झालेल्या बैठकीत विरोधकांनीही उपस्थित राहून ओबीसींबाबतची ठाम भूमिका मांडायला हवी होती, असं लक्ष्मण हाके म्हणाले आहेत.
यावेळी त्यांनी आरक्षणावरून राज्य सरकारला इशारा दिला आहे. “ओबीसी हक्कासाठी, अधिकाराविषयी निश्चित रस्त्यावर उतरेल तुम्ही त्याला असंघटित समजू नका, तो एकत्र येत नाही म्हणजे त्याला समजत नाही अशा भ्रमात तुम्ही राहू नका.”,असं लक्ष्मण हाके (Laxman hake) म्हणाले आहेत.
“..तर सगळी लोकं मुंबईकडे येतील”
“सगे सोयऱ्याचा अध्यादेश आल्यावर फक्त ओबीसीच्या आरक्षणाला धक्का पोहोचणार नाही तर, एसटीच्या आरक्षणाला सुद्धा धक्का पोहोचणार आहे. बाळासाहेब आंबेडकरांनी देखील या गोष्टीला विरोध केलेला आहे. तेव्हा सगे सोयऱ्याचा आदेश या शासनाने जर आणला तर, ओबीसी एससी, एसटी आरक्षणासाठी सगळी लोकं मुंबईकडे येतील.”, असा इशाराच हाके (Laxman hake) यांनी शिंदे सरकारला दिला आहे.
पुढे ते म्हणाले की, “मायबाप सरकारचं कर्तव्य आहे की, या महाराष्ट्रामधल्या प्रत्येक माणसाचं, शोषिताचं, वंचित या लोकांचे हक्क अधिकार टिकवणे याची तुम्ही शपथ घेतली आहे. आमच्या दायित्वाची शपथ घेऊन जर घटना विरोधी बेकायदेशीर काम करणार असाल तर तुम्हाला या गोष्टीचा जाब विचारला जाईल. आम्ही जनतेच्या दरबारात जाऊन जन आंदोलन उभं करू.”
News Title – Laxman Hake warning to the state government
महत्त्वाच्या बातम्या-
“मराठा आणि धनगर समाज यांच्यात…”; जरांगे पाटलांनी घेतली धनगर उपोषणकर्त्यांची भेट
बद्रीनाथमधील पातालगंगा टनलजवळ भूस्खलन, राष्ट्रीय महामार्ग झाले बंद; पाहा थरारक Video
वरळी हिट अँड रन प्रकरणानंतर राजेश शाह यांची शिवसेनेतून हकालपट्टी!
“..तरी मराठी इंडस्ट्री मूग गिळून गप्प का?”; वरळी हिट अँड रन प्रकरणी संजय राऊतांचा सवाल
‘तुमचा वेळ घ्या’ म्हणत हाॅट अंदाजात अभिनेत्रीचे फोटो होतायत व्हायरल!






