Laxman Hake | मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे आक्रमक होताना दिसत आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी (Laxman Hake) मनोज जरांगेंवर हल्लाबोल केला आहे. मनोज जरांगे तुझी माझ्यासमोर लायकी नसल्याचं वक्तव्य ओबीसी समाजाचे उपोषणकर्ते लक्ष्मण हाकेंनी (Laxman Hake) केलं.
ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशी ओबीसी समाजाची भूमिका आहे. त्यामुळे आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे हे गेल्या आठ दिवसांपासून जालन्यातील वडीगोद्री येथे उपोषण करताना दिसत आहेत. तसेच आजचा त्याचा उपोषणाचा नववा दिवस आहे.
“जरांगेंची माझ्यासमोर बोलायची लायकी नाही”
ओबीसी समाजाचे नेते आणि उपोषणकर्ते लक्ष्मण हाकेंनी (Laxman Hake) मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले मिस्टर जरांगे तुम्हाला आरक्षणामधील पॉईंट शून्यसुद्धा कळत नाही. देशाला स्वातंत्र्य मिळून 78 वर्षे झाले. तसेच मंडल आयोग लागू होऊन आता 27 वर्षे होऊन गेली आणि आता 70 वर्षांचा जावयी शोध काढला कोणी?. म्हणून मी बोलतोय जरांगेंची माझ्यासमोर बोलायची लायकी नाही. याला आधी शिक्षण द्या. याला अगोदर पॉलिसी शिकवा. माझी चिडचिड होते हे मान्य आहे. मी थोडासा एकेरी बोलतोय. पण आमच्या या वेदना आहेत, म्हणून हे शब्द येत असल्याचं लक्ष्मण हाके म्हणाले.
त्यानंतर हाकेंनी भुजबळांवर केलेल्या टीकेचा समाचार घेतला आहे. “मनोज जरांगे नेहमी भुजबळांना म्हणतात की खाल्ल. या जरांगेंना एक सवाल आहे. या महाराष्ट्रात कालचं बजेटसुद्धा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर 60 टक्के ओबीसींना शंभर टक्क्यांपैकी एक टक्केसुद्धा बजेट राबवता आलं नाही.
त्यानंतर ते पुढे म्हणाले की, जरांगे कायदा बनवणारे कोण? त्यांची अंमलबजावणी करणारे कोण? आमदार कोण? खासदार कोण? मुख्यमंत्री कोण? मराठेच ना? ओबीसीला एक टक्का बजेट कोणी दिलं नाही, असा हल्लाबोल लक्ष्मण हाकेंनी केला.
जरांगे जर ओबीसींनी आरक्षण खाल्लं असतं तर ओबीसींचे 400 कारखाने दिसले असते. या महाराष्ट्रात 200 साखर कारखाने आहेत. त्यापैकी 100 सहकारी आणि 100 खासगी कारखाने आहेत. त्यापैकी 10 ते 15 कारखाने सोडल्या 90 टक्के कारखाने हे मराठा समाजाचे असल्याचं लक्ष्मण हाके म्हणाले आहेत.
News Title – Laxman Hake Slam To Maratha reservation Leader Manoj Jarange patil News Update
महत्त्वाच्या बातम्या
ओबीसींच्या शिष्टमंडळात कोण?, महत्त्वाची माहिती आली समोर
“मला लग्नव्यवस्था पटत नाही, त्यापेक्षा लिव्ह इन…”, सैराटफेम तानाजीचं मोठं वक्तव्य
राज्यातील पोलीस भरतीबाबत देवेंद्र फडणवीस यांची सर्वात मोठी घोषणा!
पोस्ट ऑफिसची ‘ही’ स्कीम करेल मालमाल; व्याजातूनच कराल बक्कळ कमाई
“माझ्या शरिरावर टॅग, शिवाय त्या रात्री झोपायला…”, करिश्मा कपूरने केला गौप्यस्फोट






