Ladki Bahin Yojana | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. या योजनेअंतर्गत आर्थिक मदतीची प्रतीक्षा करणाऱ्या महिलांसाठी आता मोठी घोषणा करण्यात आली असून, राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी स्वतः याबाबतची माहिती दिली आहे. त्यामुळे राज्यभरातील लाखो लाडक्या बहिणींमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला आर्थिक सहाय्य दिले जाते. जानेवारी 2026 च्या सुरुवातीला लाभार्थ्यांच्या खात्यात नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला होता. मात्र डिसेंबर आणि चालू जानेवारी महिन्याच्या हप्त्याबाबत महिलांमध्ये उत्सुकता होती. अखेर या प्रतीक्षेला पूर्णविराम मिळाल्याने महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.
लाडकी बहीण योजना महायुतीसाठी ठरली वरदान :
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना मानली जाते. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. या मदतीमुळे महिलांना आर्थिक बळ मिळत असून, घरगुती खर्चात हातभार लागतो आहे. त्यामुळे ग्रामीण तसेच शहरी भागात या योजनेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. (Maharashtra Government Scheme)
या योजनेचा सकारात्मक परिणाम राजकीय पातळीवरही दिसून आला आहे. 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांपासून ते डिसेंबर 2025 मधील नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकांपर्यंत महायुतीला या योजनेचा मोठा फायदा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. महिलांचा विश्वास मिळवण्यात लाडकी बहीण योजना निर्णायक ठरत असल्याचे चित्र आहे.
Ladki Bahin Yojana | दोन महिन्यांचे पैसे एकत्र मिळणार :
दरम्यान महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही मोठी घोषणा करण्यात आली आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले की, डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यांचे पैसे लाभार्थ्यांना एकत्र दिले जाणार आहेत. त्यामुळे महिलांच्या खात्यात थेट 3000 रुपये जमा होणार आहेत. (Ladki Bahin Yojana)
गिरीश महाजन (Girish Mahajan Announcement) यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डलवरून याबाबत माहिती देताना मकर संक्रांतीपूर्वी ही रक्कम जमा होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. 14 जानेवारीपूर्वी सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा एकत्रित हप्ता जमा केला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली आहे. मकर संक्रांतीच्या आधीच लाडक्या बहिणींना ही आर्थिक भेट मिळणार असल्याने राज्यभरात महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.






