लाडक्या बहीण योजनेत मुदतवाढ! ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज

On: October 11, 2024 5:15 PM
Ladki Bahin Yojana
---Advertisement---

Ladki Bahin Yojana l राज्य सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही भन्नाट योजना राबवली आहे. या योजनेच्या अंतर्गत महिलांना प्रत्येकी महिन्याला 1500 रुपये आर्थिक मदत म्हणून दिले जातात. या योजनेचे पाच हप्ते महिलांच्या खात्यावर जमा देखील झाले आहेत. अशातच आता राज्य सरकारने या योजनेच्या मुदतवाढीचा निर्णय घेतला आहे.

‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज : 

आता महाराष्ट्रातील महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. त्यामुळे आता राज्यातील महिला 15 ऑक्टोबर 2024 रात्री बारा वाजेपर्यंत या योजनेसाठी अर्ज करू शकतात. मात्र आता हे अर्ज फक्त अंगणवाडी सेविकामार्फतच भरावे लागणार आहेत.

या योजनेचे आतापर्यंत पाच हप्ते जमा झाले आहेत. अशातच आता राज्य सरकारने मुदतवाढीचा निर्णय घेतल्याने महिलांना पुन्हा एकदा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे आता महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

Ladki Bahin Yojana l पैसे आले की नाही अशाप्रकारे चेक करा? :

– ज्या बँकेत तुमचं खातं आहे त्या बँकेच्या कस्टमर केअरला फोन करून तुमच्या बँकेत पैसे जमा झाले की नाही हे विचारू शकता.

– तुम्ही ऑनलाईन बँकिंग किंवा बँकेच्या अॅपच्या माध्यमातून बँक स्टेटमेंट डाऊनलोड करून चेक करू शकता.

– तुमच्या बँक खात्यावर पैसे जमा झाले असतील तर नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर तुम्हाला टेक्स्ट मेसेज येईल.

– तुम्ही ऑनलाईन बँकिंग वापरत नसाल तर प्रत्यक्ष बँकेत जाऊन देखील तपासू शकता.

News Title : Ladki bahin yojana online apply last date extended

महत्वाच्या बातम्या –

नवीन अपडेट्ससह KTM बाईक लाँच; जाणून घ्या किंमत

रतन टाटा यांचा वारसदार ठरला! ‘या’ व्यक्तीवर सोपवली जबाबदारी

मोठी बातमी! बोपदेव घाट अत्याचार प्रकरणातील तीन संशयित ताब्यात

अजितदादा आणि प्रकाश आंबेडकरांनी एकत्र यावं; ‘या’ बड्या आमदाराची इच्छा

IRCTC चं नोव्हेंबर स्पेशल टुर पॅकेज, ‘या’ मंदिरांना स्वस्तात भेट देण्याची संधी!

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now