‘लाडकी बहीण योजने’साठी आता मोबाइलवरून करा अर्ज; ‘या’ स्टेप्स करा फॉलो

Ladki Bahin Yojana | राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये महिलांसाठी विविध योजनांची घोषणा केली. राज्य सरकारने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची सध्या जोरदार चर्चा आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रतिमहिना 1500 रुपये मिळणार आहेत.

या योजनेची घोषणा झाल्यानंतर महिलांची अर्ज करण्यासाठी झुंबड उडाली होती. लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या उत्पन्नाचा दाखला आणि डोमेसाईलसाठी लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या.त्यानंतर सरकारने मोठा निर्णय घेत या दोन्ही दाखल्यांची अट शिथिल केली.

याचबरोबर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी 15 जुलैपर्यत शेवटची तारीख होती. पण सरकारने महिलांच्या अडचणी लक्षात घेता ही तारीख 31 ऑगस्टपर्यंत वाढवून दिली. या लेखात या योजनेबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही आता मोबाईल द्वारे देखील अर्ज करू शकता. त्यासाठी (Ladki Bahin Yojana) कोण कोणती कागदपत्रे हवी आणि फॉर्म भरण्याची योग्य पद्धत काय?, याबाबत सगळी माहिती या लेखात दिली आहे.

मोबाइलवर ‘असा’ करा अर्ज

  • सर्वप्रथम तुम्हाला गुगलच्या प्ले स्टोअर वर नारीशक्ती दूत हे ॲप सर्च करायचंय आणि ते इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. या ॲपद्वारे तुम्ही कित्येक जणांचे (Ladki Bahin Yojana)अर्ज भरू शकता.
  • आता ॲप इन्स्टॉल झाल्यावर त्याला ओपन करा.
  • आता तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर, ओटीपी आणि टर्म्स अँड कंडिशन यावर क्लिक करून या अॅप्लीकेशनला लॉगिन करून घ्यायचे आहे.
  • त्यानंतर तुमच्यासमोर प्रोफाइल अपडेट करा असा ऑप्शन दिसेल.
  • त्यात तुम्हाला तुमचं पूर्ण नाव, ईमेल आयडी, तुमचा जिल्हा, तालुका आणि नारीशक्तीचा प्रकार म्हणजे सर्वसामान्य महिला, बचत गट अध्यक्ष, गृहिणी, ग्रामसेवक या सगळ्या गोष्टी भरायच्या आहेत.
  • यानंतर तुमचे प्रोफाईल अपडेट झाले असेल.
  • पुढे तुम्हाला नारीशक्ती दूत या पर्यायावर क्लिक करून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या पर्याय वरती क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर सर्वात आधी तुम्हाला या अॅप्लिकेशनला लोकेशनची परमिशन द्यावी लागेल.
  • आता तुमच्यासमोर लाडकी बहीण योजनेचा (Ladki Bahin Yojana) फॉर्म येईल. हा फॉर्म तुम्हाला कोणतीही चूक न करता भरायचा आहे. तुमच्या आधार कार्डवर जी माहिती आहे तीच माहिती तुम्हाला येथे भरायची आहे.
  • यामध्ये तुम्हाला आधार कार्डवरील संपूर्ण नाव, जन्मतारीख, पतीचे किंवा वडिलांचे नाव, तुमचे गाव, तालुका, जिल्हा, पिन कोड, आधार कार्ड क्रमांक आणि तुम्ही इतर शासनाच्या योजनेचा लाभ घेत असाल तर त्याची माहिती भरायची आहे.
  • जर तुम्ही शासनाच्या इतर योजनेचा लाभ घेत नसाल तर ‘नाही’ या पर्यायावर क्लिक करा.
  • यानंतर खाली तुमची वैवाहिक स्थिती काय आहे ते टाकायचे आहे.
  • त्यासोबतच तुम्हाला महिलेचे लग्ना आधीचे संपूर्ण नाव तेथे नमूद करायचे आहे.
  • जर महिलेचा जन्म परप्रांतात झाला असेल तर ‘हो’ निवडा आणि जर महाराष्ट्रात झाला असेल तर ‘नाही’ या पर्यायावर क्लिक करा.
  • आता खाली अर्जदाराच्या बँकेसंबंधित तपशील तुम्हाला भरायचा आहे. त्यात अकाउंट नंबर, बँकेचे नाव, आयएफसी क्रमांक, आधार कार्ड बँक खात्याला लिंक आहे की नाही याची सविस्तर माहिती भरायची आहे.
  • पुढे खाली तुम्हाला काही कागदपत्रे अपलोड (Ladki Bahin Yojana) करण्याचा पर्याय येईल.
  • यामध्ये आधार कार्ड, अधिवास प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला, उत्पन्न प्रमाणपत्र किंवा पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड, अर्जदाराचे हमीपत्र, बँक पासबुक, आणि महिलेचा जन्म जर पर प्रांतामध्ये झाला असेल तर त्याचा दाखला ही सर्व कागदपत्रे तुम्हाला अपलोड करावी लागतील.
  • आता सर्व कागदपत्रे अपलोड केल्यानंतर तुम्हाला खाली अर्जदाराच्या फोटोचा ऑप्शन आला असेल.
  • तुम्हाला या ठिकाणी कोणताही फोटो अपलोड करायचा नाही. तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या कॅमेऱ्याने अर्जदार महिलेचा लाईव्ह फोटो काढून अपलोड करावा लागेल.
  • यांनंतर फोटो काढून अपलोड झाल्यावर तुम्हाला खाली “Accept हमीपत्र डिस्क्लेमर” यावर क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर तुम्हाला या योजनेसाठी अटी आणि शर्ती काय आहेत याची माहिती आली असेल.
  • आता तुम्हाला ते अॅक्सेप्ट करायचे आहे.
  • त्यानंतर तुम्ही अपलोड केलेली कागदपत्रे पुन्हा एकदा चेक करून घ्या. त्यानंतर खाली तुम्हाला सबमिट फॉर्म या बटनावर क्लिक करायचं आहे.
  • आता तुम्हाला एक ओटीपी येईल तो (Ladki Bahin Yojana) ओटीपी टाका.
  • अशा पद्धतीने तुम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फॉर्म या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण भरू शकता.

News Title : Ladki Bahin Yojana online apply

महत्वाच्या बातम्या-

हवामान विभागाचा ‘या’ जिल्ह्यांना हायअलर्ट; पुढील दोन दिवस..

आज ‘या’ 4 राशींना प्रत्येक कार्यात यश मिळेल!

“साहेब मला माफ करा”, वसंत मोरेंचा प्रकाश आंबेडकरांना मेसेज

वसंत मोरेंनी उद्धव ठाकरेंची भेट घेताच वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते संतापले!

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कडेवर बुमराहचा लेक, फोटो होतोय व्हायरल