“….तर त्याला जेलमध्ये टाकू”; एकनाथ शिंदेंचा गंभीर इशारा

Ladki Bahin Yojana | सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे. मागच्या आठवड्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची (Ladki Bahin Yojana) घोषणा केली आहे. या योजनेसाठी जीआर काढण्यात आला आहे. योजनेतील पात्र महिलांना महिन्याला 1500 रूपये आणि वर्षाला 18,000 रूपये सरकार देणार आहे.

“विरोधकांच्या पोटात दुखतं”

1 जुलैपासून ही योजना सुरू होणार आहे. त्यात तुम्हाला 46,000 कोटी रूपये माता भगिणींना देणार आहोत. त्याचा तुम्हाला आनंद व्हायला पाहिजे होता. जनतेला काही द्यायचं म्हटलं की, विरोधकांच्या पोटात दुखतं, असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत. यावेळी बोलत असताना त्यांनी उद्धव ठाकरेंचं नाव न घेता निशाणा साधला आहे. (Ladki Bahin Yojana)

जो चांगलं होतंय तिथं चांगलं म्हटलं पाहिजे. जिथे चुकत असेल तिथे सूचना करा. विरोधी पक्षाने चांगलं म्हटलं तर असं एकिवात नाही. ही योजना म्हणजे आम्ही बहिणींना दिलेला आहेर असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. हा आहेर नेहमी नियमित देत राहणार आहे. त्याची कोणी काळजी करू नका. 2.50 लाख बीपीएल धारकांना योजनेचा फायदा घेता येणार आहे, असल्याचं एकनाथ शिंदे म्हणालेत.

कोणीही सरकारी कर्मचारी जर बहिणींकडून पैसे घेण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला जेलमध्ये टाकू त्याचं निलंबन करू, असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. माता भगिणींना द्यायला एक रूपया नाही. जो मागत असेल तर त्याची तक्रार केल्यास जेलमध्ये टाकू, बाहेर येऊ देणार नाही”, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. त्यानंतर लाडकी बहीण योजनेनंतर त्यांनी सख्ख्या भावाचं काय? विचारलं. त्यांना सख्खे भाऊ कळले नाहीत. त्यांचं कसं व्हायचं?, असा सवाल करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी टोला लगावला.

काय आहे योजना?

या योजना अंर्तगत लाभार्थी महिलांना 1500 रुपये महिना प्रति दिले जातील. राज्यात जवळपास 3.50 कोटी महिलांना या योजनेचा लाभ होण्याची आशा आहे. 21 ते 60 वय असलेल्या महिला याच्या लाभार्थी (Ladki Bahin Yojana) असतील.

News Title – Ladki Bahin Yojana On Eknath Shinde Slam To Uddhav Thackeray

महत्त्वाच्या बातम्या

सलमानला मारण्यासाठी तब्बल ‘एवढ्या’ लाखांची सुपारी; धक्कादायक माहिती समोर

महाराष्ट्र विधान परिषदेचा अध्यक्ष कोण होणार? ‘या’ तीन भाजप नेत्यांची नावे शर्यतीत

पंकजा मुंडेंना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया

राहुल गांधींनी संसदेत भगवान शंकराचा फोटो का दाखवला? काय आहे यामागचं कारण

बॉयफ्रेंडने लग्नाला नकार दिल्याने गर्लफ्रेंडने केलं धक्कादायक कृत्य