लाडक्या बहिणींनो लक्ष द्या! जानेवारीचा हप्ता ‘या’ तारखेनंतर जमा होणार

On: January 14, 2026 7:17 PM
Ladki Bahin Yojana
---Advertisement---

Ladki Bahin Yojana | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची अत्यंत लोकप्रिय आणि महत्त्वाकांक्षी योजना ठरली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात दरमहा १५०० रुपयांचा थेट लाभ जमा केला जातो. राज्यातील लाखो महिलांना या योजनेमुळे आर्थिक आधार मिळत असून, घरखर्चासाठी मोठा दिलासा मिळत असल्याचे चित्र आहे. (CM Fadnavis Update)

सण-उत्सवांच्या काळात महिलांना दिलासा मिळावा यासाठी सरकारकडून अनेकदा आगाऊ हप्ता देण्याची परंपरा राहिली आहे. त्यानुसार नोव्हेंबर महिन्याचा हप्ता डिसेंबरच्या अखेरीस देण्यात आला होता. त्यानंतर डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा एकत्रित लाभ मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर देण्याचे नियोजन सरकारकडून करण्यात आले होते. (Ladki Bahin January Installment)

निवडणूक आचारसंहितेमुळे अडथळा :

दरम्यान, राज्यात सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे आदर्श आचारसंहिता लागू झाली असून, याच कारणामुळे लाडकी बहीण योजनेच्या आगाऊ हप्त्यावर वाद निर्माण झाला. काँग्रेस पक्षाने मतदानापूर्वी अशा स्वरूपात लाभ देणे चुकीचे असल्याचा आरोप करत राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती.

या तक्रारीची दखल घेत राज्य निवडणूक आयोगाने आपली स्पष्ट भूमिका मांडली. आयोगाने निवडणूक जाहीर होण्यापूर्वी सुरू झालेल्या योजनांचा नियमित हप्ता देण्यास कोणतीही हरकत नसल्याचे सांगितले, मात्र जानेवारी महिन्याचा हप्ता आगाऊ स्वरूपात देण्यास मज्जाव केला. त्यामुळे सरकारला आपला निर्णय बदलावा लागला.

Ladki Bahin Yojana | CM फडणवीस यांची स्पष्ट भूमिका :

या संपूर्ण प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे. काही लोकांना ही योजना खुपत असल्याने ते निवडणूक आयोगाकडे गेले, असा टोला त्यांनी लगावला. आयोगाने जो निर्णय दिला आहे, तो आम्ही मान्य करतो. मूळ हप्ता आम्ही देतच आहोत आणि तो देण्यात आला आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. (Ladki Bahin Yojana)

सणासुदीच्या काळात आगाऊ हप्ता देण्याची सरकारची परंपरा असल्याचे सांगत, मात्र आयोगाने आगाऊ देऊ नका असे निर्देश दिल्यामुळे आता १६ जानेवारीनंतर जानेवारी महिन्याचा हप्ता दिला जाईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. राज्य निवडणूक आयोगाने देखील आदर्श आचारसंहितेत नवीन लाभ, अग्रिम हप्ता किंवा योजनेचा विस्तार करता येणार नाही, असे स्पष्ट केले आहे. (Ladki Bahin January Installment)

तारीख झाली जवळपास निश्चित :

सरकारच्या या आश्वासनानंतर लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा हप्ता १६ जानेवारीनंतर खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता प्रत्यक्ष रक्कम खात्यात कधी जमा होते याकडे राज्यातील लाखो महिलांचे लक्ष लागले आहे.

News Title : Ladki Bahin Yojana: January Installment Date Fixed, CM Fadnavis Gives Big Update

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now