लाडक्या बहीण योजनेचा हप्ता कधी जमा होणार? महत्वाची माहिती समोर

On: February 18, 2026 4:31 PM
Ladki Bahin Yojana
---Advertisement---

Ladki Bahin Yojana | राज्यातील लाभार्थी महिलांसाठी मोठी घडामोड समोर आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) अंतर्गत जानेवारी महिन्याचा हप्ता अद्याप जमा न झाल्याने संभ्रम निर्माण झाला होता. आता जानेवारी आणि फेब्रुवारीचे मिळून 3000 रुपये एकत्र देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जानेवारी-फेब्रुवारी हप्ता एकत्र येण्याची शक्यता :

फेब्रुवारी महिना संपत आला तरी अनेक महिलांच्या खात्यात जानेवारीचा हप्ता जमा झाला नव्हता. सुरुवातीला हा हप्ता फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र तांत्रिक अडचणी किंवा प्रशासकीय प्रक्रियेमुळे निधी वितरण लांबले. त्यामुळे लाभार्थ्यांमध्ये चिंता निर्माण झाली होती.

आता राज्य सरकार दोन्ही महिन्यांचा हप्ता एकत्र जमा करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांचे मिळून 3000 रुपये थेट बँक खात्यात वर्ग केले जाऊ शकतात. यासंदर्भात अधिकृत घोषणा झालेली नसली तरी निधी वितरणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे बोलले जात आहे.

Ladki Bahin Yojana | होळीपूर्वी जमा होण्याची शक्यता, 6000 रुपयांचाही लाभ :

मिळालेल्या माहितीनुसार, मार्चच्या पहिल्या आठवड्यात रक्कम हस्तांतरित होऊ शकते. 2 आणि 3 मार्च रोजी होळीचा सण असल्याने सणासुदीच्या पार्श्वभूमीवर महिलांना आर्थिक मदत देण्याचा सरकारचा प्रयत्न असू शकतो. त्यामुळे होळीपूर्वी खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, काही लाभार्थी महिलांना 6000 रुपयांपर्यंतची रक्कम मिळू शकते. ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले होते; पण केवायसी (KYC) त्रुटी किंवा आधार लिंकिंग समस्येमुळे मागील 3-4 हप्ते थांबले होते, त्यांना थकीत सर्व रक्कम एकत्र दिली जाणार आहे. त्यामुळे चार महिन्यांचे मिळून 6000 रुपये खात्यात येऊ शकतात. हप्ता न मिळाल्यास महिलांनी आपले बँक खाते आधारशी जोडलेले आहे का आणि डीबीटी (DBT) सेवा सक्रिय आहे का, याची खात्री करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

News Title: Ladki Bahin Installment Update 2026

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now