लाडकी बहीण योजनेबाबत अजित पवारांची नवी मोठी घोषणा!

On: March 17, 2025 2:31 PM
Ladaki Bahin Yojana Will Be Improved says Ajit Pawar
---Advertisement---

Ladaki Bahin Yojana | महिला सशक्तीकरणसाठी महायुती सरकारने लाडकी बहीण (Ladaki Bahin Yojana) योजना सुरू केली. मात्र, अशात ही योजना बंद होणार असल्याचे आरोप विरोधकांकडून केले जात होते. यावरच उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी विधानसभेत स्पष्ट केले की, ही योजना बंद केली जाणार नाही, पण त्यामध्ये काही सुधारणा करण्यात येणार आहेत. त्यामुळे महिलांना अधिक लाभ मिळेल आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेलाही सकारात्मक परिणाम दिसून येईल.

महिला सक्षमीकरणासाठी कर्ज योजना येणार

अजित पवार यांनी स्पष्ट केले की, लाडकी बहीण योजना केवळ आर्थिक मदतीपुरती मर्यादित राहणार नाही, तर महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी यात आणखी सुधारणा करण्यात येतील. सध्या या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1500 थेट त्यांच्या खात्यात जमा केले जातात. आता, या योजनेसह महिलांसाठी विशेष कर्ज योजना आणण्याची योजना आहे.

मुंबई बँकेत लाडकी बहीण योजनेच्या खातेदार महिलांना 10,000 ते 25,000 पर्यंत कर्ज दिले जाणार आहे. तसेच, महिला आर्थिक विकास महामंडळ, जिल्हा सहकारी बँका आणि इतर सहकारी बँकांनाही अशा स्वरूपाच्या कर्ज योजना सुरू करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामुळे ज्या महिलांना छोटा-मोठा व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांना मोठी संधी उपलब्ध होईल.

महिलांना सक्षम करण्यासाठी मोठा निधी

लाडकी बहीण योजनेद्वारे दरवर्षी सुमारे 45,000 कोटी महिलांच्या हाती जात आहेत. त्यामुळे हा पैसा महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासोबतच राज्याच्या अर्थव्यवस्थेलाही चालना देईल. महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी ही योजना आणखी प्रभावी केली जाईल.

शेती आणि अर्थव्यवस्थेला पाठबळ

अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठीही महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. 2023-24 मध्ये राज्यातील कृषी क्षेत्राचा विकास दर 3.3% होता, जो 2024-25 मध्ये 8.7% पर्यंत वाढवण्यात यश आले आहे. सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिल्यामुळे ही वाढ झाली आहे.

तसेच, आधुनिक शेतीला चालना देण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), जलयुक्त शिवार, एक तालुका एक बाजारपेठ, सिंचन प्रकल्प, बांबू लागवड आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी मराठवाडा वॉटर ग्रीडसारख्या योजना राबवण्यात येणार आहेत. सरकार येत्या दोन वर्षांत कृषी क्षेत्रासाठी AI वापराला चालना देण्यासाठी 500 कोटींचा निधी खर्च करणार आहे.

Title : Ladaki Bahin Yojana Will Be Improved says Ajit Pawar

 

Join WhatsApp Group

Join Now