बीड कथित ऑडिओ क्लिप प्रकरणी ‘या’ नेत्याची शिवसेनेतून हकालपट्टी!

Kundlik Khade | लोकसभा निवडणुकीत बीड या मतदारसंघाची सर्वाधिक चर्चा झाली. येथे निकाल लागायला बराच उशीर झाला होता. सर्वांच्या मनात येथे कोण जिंकणार याबाबत धाकधूक होती. मात्र, शेवटच्या टप्प्यात शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी बाजी मारली. त्यांनी भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचा पराभव केला. बजरंग सोनवणेंकडून पंकजा मुंडेंचा 6 हजार मतांनी पराभव झाला.

या पराभवानंतर जिल्ह्यात काही ठिकाणी आत्महत्याच्या घटना घडल्या. तर, पंकजा मुंडेंसंदर्भात आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यामुळे बीड जिल्ह्यातील अनेक तालुक्यात बंद पुकारण्यात आला होता. मुंडे समर्थकांना हा पराभव खूपच जिव्हारी लागला. अशात नुकतीच एक खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती.

कुंडलिक खांडे यांची पक्षातून हकालपट्टी

लोकसभा निवडणूक काळात शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्यासोबत एका राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याची चर्चा चालू असतानाची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. यामध्ये निवडणुकीपूर्वीच बजरंग सोनवणे यांना त्यांनी कशी मदत करायची हे सांगण्यात आल्याचं म्हटलं गेलं. या क्लिपनंतर राजकारणात याची प्रचंड चर्चा झाली.

कुंडलिक खांडे आणि शरद पवार गटाचे कार्यकर्ते शिवराज बांगर यांच्यातील संवादाची कथित ऑडीओ क्लीप व्हायरल झाल्यानंतर शिंदे गटाकडून आता मोठी कारवाई करण्यात आली आहे. ही कथित ऑडीओ क्लीप व्हायरल झाल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनी देखील टीका केली होती. यानंतर मुंडे समर्थक देखील चांगलेच आक्रमक झाले होते. बीड शहरातील जालना रोडवर असलेले खांडे (Kundlik Khade) यांचे कार्यालय जमावाने दगडफेक करुन तोडले होते. अशात शिवसेना शिंदे गटाकडून देखील मोठी कारवाई करण्यात आली आहे.

कुंडलिक खांडे आणि शिवराज बांगर यांच्या ऑडिओ क्लिपने खळबळ

पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत कुंडलिक खांडे यांची हकालपट्टी करत असल्याची घोषणा शिवसेनेकडून करण्यात आली आहे. कुंडलिक खांडे यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर पक्षाकडून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यांना अजून एका प्रकरणी तीन दिवसाची कोठडी सुनावली आहे. आपल्याच पक्षाच्या उपजिल्हाप्रमुखावर जीवघेणा हल्ला केल्याच्या प्रकरणी कुंडलिक खांडेला (Kundlik Khade) बीडच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये शिंदे गटाचे कुंडलिक खांडे हे मी पहिल्यांदाच पंकजा मुंडेंना धोका दिला, असं म्हणत असल्याचं ऐकू येत आहे. आपण 376 बुथवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना मदत केली, असं कुंडलिक खांडे म्हणाले होते. त्यांच्या या क्लिपने राज्यात एकच खळबळ उडाली होती.

News Title –  Kundlik Khade Removed From Shiv Sena

महत्त्वाच्या बातम्या-

“डोन्ट अंडर एस्टीमेट द पॉवर ऑफ कॉमन मॅन”; लंके समर्थकांनी बॅनरद्वारे विखे पाटलांना डिवचलं

ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकार घडवणार देवदर्शन, एकनाथ शिंदेंनी केली मोठी घोषणा

‘या’ दिग्गज खेळाडूने टीम इंडियाबद्दल केली धक्कादायक भविष्यवाणी!

शत्रुघ्न सिन्हांची प्रकृती बिघडली?, लेक सोनाक्षी आणि जावई झहीर यांनी घेतली भेट

पेन्शन संदर्भात सरकारने ‘हा’ नियम बदलला; लाखो कर्मचाऱ्यांना होणार फायदाच फायदा