‘आता सुट्टी नाही’; यादी जाहीर होण्याआधीच भाजप नेत्याची मोठी घोषणा!

On: October 19, 2024 4:24 PM
BJP Yuva Morcha
---Advertisement---

कोल्हापूर | युथ आयकॉन म्हणून महाराष्ट्राला परिचित झालेले कृष्णराज धनंजय महाडिक (Krishnaraaj Mahadik) आता राजकारणाच्या मैदानात उतरणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. खासदार धनंजय महाडिकांचे चिरंजीव कृष्णराज महाडिक राजकारणात पाऊल ठेवण्याच्या तयारीत आहेत.

कृष्णराज महाडिक (Krishnaraaj Mahadik) निवडणूक लढणार असल्याची चर्चा आधीपासून सुरू होती. त्यांचे मतदारसंघात बँनर्स देखील झळकत होते. आता त्यांची उमेदवारी कोल्हापूर उत्तर, दक्षिण की कोल्हापूर लोकसभा याची चर्चा वेगावली आहे.

महाडिकांचा लेक विधानसभेच्या रिंगणात?

कृष्णराज महाडिक आता राजकीय कुस्तीच्या आखाड्यात उतरणार आहेत. तसे संकेत त्यांनी नव्या व्हीडिओच्या माध्यमातून दिले आहेत. कृष्णराज महाडिक यांनी एक व्हीडिओ यूट्यूबवर शेअर केला आहे.

‘आता सुट्टी नाही’ असं म्हणत कृष्णराज महाडिक यांनी नवा व्हीडिओ शेअर केलाय. यात कृष्णराज यांच्याबद्दल बोलताना काही लोकांनी ‘भावी आमदार’ असा उल्लेख केला आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीतून कृष्णराज महाडिक विधानसभेची निवडणूक लढू शकतात.

कोण आहेत Krishnaraaj Mahadik?

कृष्णराज महाडिक हे यूट्यूबर आहेत. ‘Krish Mahadik’ असं त्यांच्या यूट्यूब चॅनेलचं नाव आहे. यावर ते अनेक व्हीडिओ शेअर करत असतात. त्यांच्या कौटुंबिक व्हीडिओंना नेटकरी पसंती देतात.

खासदार धनंजय महाडिक यांचे सुपुत्र कृष्णराज महाडिक हे रेसिंग या क्रीडा क्षेत्रातील नैपुण्यामुळे जागतिक पातळीवर चमकले. त्यानंतर युट्युबवर ‘महाडिक पॅटर्न’ या अतिशय गाजलेल्या ब्लॉगमुळे महाराष्ट्रात परिचित झाले. राज्यभर त्यांचा एक मोठा चाहतावर्ग तयार झाला आहे. त्यातून मिळणारे सर्व उत्पन्न समाज सेवेसाठी खर्च करण्याचा त्यांचा निर्णय कौतुकास्पद ठरला.

Krishnaraj Mahadik

महत्त्वाच्या बातम्या- 

“मतदारांना बाहेरून आणण्यासाठी ‘फोन पे’ करा”; शिंदेसेनेच्या आमदाराचं वक्तव्य

मशाल घेऊन चटके द्या; अजित पवारांना मोठा धक्का!

निवडणुकीआधी गिरीश महाजन संकटात; महिला पोलीस अधिकाऱ्याचे अत्यंत गंभीर आरोप

ठाकरे गटाची संभाव्य उमेदवार यादी जाहीर! पाहा यादी एका क्लिकवर

ठाकरे गटाची संभाव्य उमेदवार यादी समोर; पाहा कुणा-कुणाला मिळाली संधी?

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now