कोपर्डी बलात्कार प्रकरणात नवा ट्विस्ट; …त्याला स्मशानभूमीत रात्रभर नग्न बसवले

On: May 3, 2024 11:26 AM
Kopardi Crime
---Advertisement---

Kopardi Crime l कोपर्डी बलात्काराने संपूर्ण राज्याला हादरवून टाकलं होत. अशातच आता कोपर्डीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपीच्या चुलत भावाने गळाफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे राज्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

कोपर्डीत पोलिसांचा मोठा बंदोबस्त :

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, कोपर्डी येथील बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपीच्या चुलत भावाने गळाफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. कोपर्डीच्या पीडित तरुणीच्या नातेवाईकांनी कोपर्डी बलात्कार प्रकारांतील आरोपीच्या चुलत भावाला गावात नग्न करून मारहाण आणि शिवीगाळ करत स्मशानभूमीत बसल्याचे धक्कादायक कृत्य केले आहे.

या प्रकारामुळे अपमानीत झाल्याच्या भावनेतून त्या तरुणाने आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबियांने केला आहे. याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय या घटनेनंतर कोणताही अनुचीत प्रकार घडू नये यासाठी कर्जत पोलिसांनी कोपर्डीत मोठा बंदोबस्त वाढवला आहे.

Kopardi Crime l कर्जत पोलिस ठाण्यात तक्रार केली दाखल :

याशिवाय आत्महत्या करणाऱ्या तरुणाने चिठ्ठी देखील लिहली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेतील आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे विठ्ठल ऊर्फ नितीन शिंदे असे आहे. याप्रकरणी आत्महत्या केलेल्या तरुणाच्या वडिलांनी कर्जत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

तसेच आत्महत्या केलेल्या तरुणाने चिठ्ठीमध्ये असे लिहले आहे की, स्वप्निल सुद्रिक आणि बंटी सुद्रिक हेच माझ्या आत्महत्येला जबाबदार आहेत. आता या घटनेनंतर कर्जत पोलीसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून एकाला ताब्यात घेतले आहे. तसेच याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.

News Title – Kopardi Crime News

महत्त्वाच्या बातम्या –

मोठी दुर्घटना! हेलिकॉप्टर झालं क्रॅश; सुषमा अंधारे अन् पायलट…

काँग्रेसचं ठरलं! राहुल गांधी निवडणुकीच्या रिंगणात; या दोन गोष्टींमुळे गांधींचं पारडं जड राहणार

धक्कादायक… ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांवर हल्ला

या राशीच्या व्यक्तींनी सावधान; मित्रांशी मतभेदाची शक्यता

विखेंच्या कार्यकर्त्यांनी खोटा संदेश सोशल मीडियात व्हायरल केला, अण्णांच्या भूमिकेमुळे विखे संकटात!

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now