महत्वाची बातमी! ‘या’ दिवशी सर्व दवाखाने राहणार बंद; इमर्जन्सी असल्यास काय?

On: August 16, 2024 12:37 PM
Kolkata Rape Case
---Advertisement---

Kolkata Rape Case l गेल्या काही दिवसांपूर्वी कोलकात्यात आरजी कर मेडिकल कॉलेजात महिला डॉक्टरवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला आहे. मात्र आता या घटनेसंदर्भात अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे. या घटनेच्या निषेधार्थ IMA ने उद्या म्हणजेच 17 ऑगस्ट रोजी देशव्यापी संप पुकारला आहे.

उद्या दवाखाने राहणार बंद :

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, कोलकात्यामध्ये आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये एका महिला डॉक्टरवर बलात्कार झाला आहे. या घटनेचे तीव्र पडसाद उमटत आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्व दवाखाने उद्या बंद राहणार आहेत. मात्र IMA ने रुग्णालये सेफ झोन म्हणून घोषित करण्याची मागणी देखील केली आहे. अशातच आता या घटनेमुळे देशातील वैद्यकीय सेवेवर मोठा परिणाम होणार असल्याचे दिसून येतं आहे.

या घटनेच्या निषेधार्थ आजपासूनच देशभरातील डॉक्टरांकडून आंदोलन तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत. तसेच यासंदर्भात आयएमएने एक पत्रक देखील काढले आहे. या पत्रकारत नमूद करण्यात आले आहे की, 17 ऑगस्ट रोजी देशभरात बंद पुकारण्यात येत आहे. त्यामुळे देशभरातील सर्व दवाखाने, ओपीडी व क्लिनिक्सच्या सेवा 17 ऑगस्टला सकाळी 6 ते 18 ऑगस्टच्या सकाळी 6 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत.

Kolkata Rape Case l इमर्जन्सी असल्यास काय? :

देशभरात डॉक्टरांनी संप पुकारल्याने सर्व दवाखाने तब्बल 24 तास सेवा बंद राहणार आहेत. मात्र इमर्जन्सी म्हणजं अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. तसेच आयसीयू, अपघात विभाग आणि प्रसूतीसेवा देखील या कालावधी दरम्यान सुरू ठेवण्यात येणार असल्याचं आयएमएने स्पष्ट केलं आहे. याशिवाय अत्यावश्यक आरोग्य सेवा, आयसीयू, अतिदक्षता कक्ष व अत्यावश्यक शस्रक्रिया देखील सुरु राहणार आहेत.

कोलकत्ता येथील आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये झालेल्या महिला डॉक्टरवरील बलात्कार हत्या प्रकरणाचा तपास हायकोर्टाने हा तपास सीबीआयकडे देण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे आता थेट सीबीआय या प्रकरणाची तपासणी करणार आहे. या संपूर्ण घटनेमुळे कोलकाता शहरात तणावाची स्थिती आहे.

News Title- Kolkata Rape-Murder Case

महत्वाच्या बातम्या-

राज्यात पाऊस कधी सक्रिय होणार? हवामान विभागाने दिली माहिती

मोठी गुड न्यूज! रक्षाबंधनापूर्वीच सोनं झालं स्वस्त; काय आहेत किमती?

आज ‘या’ 5 राशींवर लक्ष्मी प्रसन्न होईल, मोठा धनलाभ होणार

जुन्नरमधील शिवनेरी ट्रेकर्सची कामगिरी; स्वातंत्र्यदिनी ‘कांगयात्से’वर फडकवला तिरंगा

‘मोठ्ठ्या ताई, तुम्ही आता आयुष्यभर…’; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळेंना झापलं

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now