शाहू महाराज vs संजय मंडलिक; कोल्हापुरात कुणी घेतली आघाडी?

Kolhapur Lok Sabha Result | कोल्हापूर मतदारसंघाची मतमोजणी रमणमळा येथील शासकीय धान्य गोदामात, तर हातकणंगले मतदारसंघाची मतमोजणी राजाराम तलाव येथील जलसंपदा विभागाच्या गोदामात सध्या सुरू आहे. आज (4 जून) सकाळी 8 वाजेपासून
मतमोजणीला सुरुवात झाली आहे.

सुरुवातीच्या कलामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज आघाडीवर आहेत. कोल्हापुरात शाहू महाराज विरुद्ध संजय मंडलिक अशी थेट लढत होत आहे. शाहू महाराज दुसऱ्या फेरीमध्ये 13 हजार मतांनी आघाडीवर असल्याची माहिती मिळाली आहे.

शाहू महाराज आघाडीवर

कोल्हापूरसाठी 6 विधानसभा मतदार संघात प्रत्येकी 14 मतमोजणी टेबल संख्या असून चंदगड 28, राधानगरी 31, कागल 26, कोल्हापूर दक्षिण 24, करवीर 26 आणि कोल्हापूर उत्तरची 23 फेऱ्यातून मतमोजणी पूर्ण होणार आहे.

शाहू महाराज vs संजय मंडलिक

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील (Kolhapur Lok Sabha Result ) मतमोजणीसाठी 349 तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीसाठी 337 कर्मचारी असे एकुण 986 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. येथे शाहूवाडी व हातकणंगले प्रत्येकी 24, इचलकरंजी 19, शिरोळ व इस्लामपूर प्रत्येकी 21 तर शिरोळसाठी 24 फेऱ्यातून मतमोजणी पूर्ण होईल.

दरम्यान, कोल्हापुरातून छत्रपती शाहू महाराज अजूनही आघाडीवर कायम आहे. सातव्या फेरीअखेर शाहू महाराज यांना 47 हजार मतांची आघाडी मिळाली आहे.त्यांच्या कार्यकर्त्यांकडून कोल्हापुरात जोरदार जल्लोष केला जातोय. कार्यकर्ते गुलाल उधळून आपला आनंद व्यक्त करत आहेत.

News Title-  Kolhapur Lok Sabha Result 2024 

महत्वाच्या बातम्या-

सांगलीत विशाल पाटील सुसाट; चंद्रहार पाटील, संजयकाका पिछाडीवर

आता एका क्लीकवर जाणून घ्या कोणाची आघाडी तर कोणाची पिछाडी?

शरद पवारांचा अजितदादांना दणका; चौथ्या फेरीतही अमोल कोल्हेंची मोठी आघाडी

अमरावतीतून मोठी बातमी समोर; नवनीत राणांवर कॉँग्रेसची आघाडी

अहमदनगरमधून मोठी अपडेट्स समोर; पाहा कोण आघाडीवर?