केएल राहुल व अथिया शेट्टीच्या घरी गोंडस परीचे आगमन, पोस्ट करत दिली गुड न्यूज

On: March 25, 2025 8:02 AM
KL Rahul and Athiya Shetty Welcome Baby Girl
---Advertisement---

KL Rahul and Athiya Shetty | क्रिकेटपटू केएल राहुल आणि अभिनेत्री अथिया शेट्टीच्या (KL Rahul and Athiya Shetty) घरी आनंदाचा क्षण आला असून, त्यांच्या आयुष्यात एका गोंडस कन्येच्या आगमनाने नवीन सुरुवात झाली आहे. प्रसिद्ध अभिनेता सुनील शेट्टी (Suniel Shetty) यांचा आजोबा होण्याचा आनंद सध्या चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.

सोशल मीडियावरून दिली गोड बातमी

24 मार्चच्या संध्याकाळी अथिया शेट्टीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक खास पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये तिने व केएल राहुलने एका गोंडस मुलीचे पालक झाल्याची माहिती दिली. पोस्टमध्ये नमूद करण्यात आले की, “आम्ही एका सुंदर मुलीचे स्वागत करत आहोत…” ही बातमी वाऱ्यासारखी पसरली असून, तिच्यावर चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींनी कमेंट करून शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

कियारा अडवाणीने (Kiara Advani) हृदयाची इमोजी शेअर करत प्रेम व्यक्त केलं, तर अर्जुन कपूर (Arjun Kapoor)ने “अभिनंदन मित्रांनो” असे लिहित त्यांच्या आनंदात भाग घेतला. पंजाबी गायक जस्सी गिलने (Jassie Gill) देखील या खास प्रसंगी शुभेच्छा दिल्या. काहीच वेळात या पोस्टला लाखोंच्या संख्येने लाईक्स मिळाले.

लग्नानंतर दोन वर्षांतच पालकत्वाचा आनंद

अथिया शेट्टी ही अभिनेता सुनील शेट्टी यांची कन्या असून, तिने भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू केएल राहुलशी 2023 साली थाटामाटात विवाह केला होता. या विवाहसोहळ्यात बॉलिवूड आणि क्रिकेट विश्वातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. लग्नानंतर दोन वर्षांच्या आतच या दोघांनी पालकत्व स्वीकारले असून, सध्या संपूर्ण शेट्टी आणि राहुल परिवार या आनंदात बुडाला आहे.

अथियाने ‘हिरो’ या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले होते. त्यानंतर ती ‘मुबारकन’ आणि ‘मोतीचूर चकनाचूर’ या चित्रपटांमध्ये झळकली. मात्र, हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसे यशस्वी ठरले नाहीत आणि त्यानंतर तिने अभिनयापासून काहीसा ब्रेक घेतला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Athiya Shetty (@athiyashetty)

दुसरीकडे, केएल राहुल सध्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL) दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाकडून खेळतो आहे. या संघाने त्याला तब्बल 12 कोटी रुपयांना आपल्या संघात समाविष्ट केलं आहे. मात्र, 24 मार्च रोजी कन्येचा जन्म झाल्याने त्याने लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) विरुद्धचा सामना सोडून मुंबईकडे प्रयाण केलं.

Title : KL Rahul and Athiya Shetty Welcome Baby Girl

 

Join WhatsApp Group

Join Now