‘तुमच्या बुडाखाली…’; किरण मानेंनी देवेंद्र फडणवीसांना सुनावलं

On: June 19, 2024 4:56 PM
Kiran Mane
---Advertisement---

Kiran Mane | वसईच्या गौराईपाडा परिसरात मंगळवारी एका तरुणीची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. आरती यादव असं या मृत तरुणीचं नाव असून रोहित यादव (Rohit Yadav) या तरुणाने लोखंडी पान्याने 15 घाव घालत तिची हत्या केली होती.

सकाळी साडेनऊनच्या सुमारास ही घटना घडली तेव्हा रस्त्यावर अनेकजण होते. मात्र, यापैकी कोणीही आरतीच्या मदतीला धावून गेले नाही. आरतीवर हल्ला करण्यापूर्वी रोहित , “क्यों किया ऐसा मेरे साथ?”, असे ओरडत होता. यानंतर त्याने आरतीवर लोखंडी पान्याने हल्ला केला.

वसईत भररस्त्यात तरूणीची हत्या

आरती रक्ताच्या थारोळ्यात पडली होती तेव्हादेखील तिला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं नाही. यावेळी काहीजणांनी रोहितला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र रोहित त्यांच्याच अंगावर लोखंडी पाना घेऊन धावून गेला. तो शेवटपर्यंत शेजारीच असलेल्या दुकानाच्या पायरीवर बसून आरतीच्या मृतदेहाकडे बघत राहिला.

या सगळ्या घटनेविषयी संताप व्यक्त केला जात आहे. अभिनेते किरण मानेंनी देखील फेसबूक पोस्ट करत या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. तसेच घडलेल्या प्रकारावरून त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

Kiran Mane | किरण मानेंची फडणवीसांवर टीका

वसईमधला तरूणीच्या हत्येचा व्हिडीओ पाहुन काळीज पिळवटलं. या तरूणीने याआधी या तरूणाबद्दल पोलीसांत तक्रार दिलेली होती. गृहमंत्री महोदय, आतातरी राजीनामा द्या, असं म्हणत किरण मानेंनी (Kiran Mane) फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

तुम्ही विरोधी पक्षनेते होता तेव्हा भर कोरोनाकाळात सुशांतसिंग राजपूतसाठी घसा खरवडून कोकलत होतात. तुमच्या बुडाखाली त्याहून भयानक अपराध रोज घडताहेत. सोडा खुर्ची. लायक माणसाला बसवा तिथे, असं किरण माने म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

प्रसाद देठेंची सुसाईड नोट चर्चेत; पंकजा मुंडेंचंही घेतलं नाव

’24 तास काम करून लेकरांचं भागत नाही…’; मराठा आंदोलकाने आयुष्य संपवलं

युगेंद्र पवार बारामतीचे नवे ‘दादा’?, अखेर सुप्रिया सुळेंनी दिलं उत्तर

“…राज्य सरकार कसं हातात येत नाही तेच बघतो”; शरद पवारांचं मोठं वक्तव्य

मनोज जरांगेंचा लक्ष्मण हाकेंवर अत्यंत गंभीर आरोप; राजकारणात खळबळ

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now