“उज्ज्वल निकम यांची सरकारी वकीलपदी नियुक्ती लोकशाहीसाठी घातक”

On: June 20, 2024 12:56 PM
Kiran Mane Post on  Ujjwal Nikam appointment
---Advertisement---

Kiran Mane | लोकसभा निवडणुकीपुर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेले उज्ज्वल निकम यांची आता विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपने त्यांना उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. मात्र, यात त्यांचा पराभव झाला. आता भाजपकडून त्यांना पुन्हा मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.

मात्र, निकम यांच्या नियुक्तीला विरोधी गटाकडून विरोध केला जातोय.सरकारनं तातडीनं या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केली होती. त्यानंतर आता ठाकरे गटाकडूनही याचा विरोध होतोय.

मराठी अभिनेते आणि ठाकरे गटाचे नेते किरण माने यांनी फेसबुकवर पोस्ट करत भाजप तसंच राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी उज्ज्वल निकम यांची पुन्हा ‘सरकारी वकील (विशेष)’ पदावर नियुक्ती झाली, हे लोकशाहीसाठी घातक असल्याचे म्हटले आहे.

नेमकं काय म्हणाले किरण माने?

हनुमान जयंतीचा जन्म असलेले निकम लोकसभेला भाजपाकडुन उभे राहिले.राहु द्या. लोकशाही आहे. नागरिक म्हणून त्यांचा अधिकार होता. ते पडले. ठीकै. लोकशाहीत जनतेने स्वत:ला हवा असलेला उमेदवार निवडण्याचा हक्क बजावला.विषय कट. पण आता उज्जवल निकम यांची पुन्हा ‘सरकारी वकील (विशेष)’ पदावर नियुक्ती झाली, हे मात्र लोकशाहीसाठी घातक आहे. असं किरण माने (Kiran Mane) यांनी म्हटलं आहे.

आजवर अशाच पदांचा गैरवापर करून या भाजपाने विरोधी पक्ष, लोकशाही, संविधान आणि देश पोखरला आहे. भक्तांनी कितीही डिंग्या मारूद्यात की, आमच्या नेत्यानं एकट्याच्या बळावर दोनशे चाळीस वगैरे आणले. पण ही मोठी फेकूगिरी आहे. ईडी, सीबीआय, आयटी, इलेक्शन कमिशन आणि महत्त्वाच्या पदांवर बसवलेली लोचट-लाचार-लोभी माणसं यांच्या बळावर भाजपाला या सिटस् मिळाल्यात हे जगजाहीर आहे. हे सगळं काढून टाकलं तर ते औषधालाही शिल्लक रहाणार नाहीत.असा सणसणीत टोला किरण माने यांनी पोस्टद्वारे भाजपला लगावला आहे.

“भाजपासारख्या पक्षाला धार्जिण असलेला निकमांसारखा माणूस..”

पुढे ते म्हणाले की, “आता जरा विचार करा भावाबहिणींनो… भाजपासारख्या पक्षाला धार्जिण असलेला निकमांसारखा माणूस सरकारी वकीलासारख्या महत्त्वाच्या पदावर असेल आणि समोर काॅंग्रेस, आप, ओरिजिनल शिवसेना किंवा राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍याचा, नेत्याचा खटला सुरू असेल… तर हा संशय बळावतो की, तो मुद्दाम त्याला अडकवण्यासाठी जोर लावणार… किंवा समोर भाजपाचा माणूस असेल तर असेही होऊ शकते की, तो मुद्दाम त्याला सुट देऊन सोडवण्याचा प्रयत्न करणार! शक्यता आहे की नाही? आपल्या धडावर असलेलं आपलं डोकं वापरून सांगा.”, असं मत किरण माने (Kiran Mane) यांनी पोस्टमध्ये व्यक्त केलं आहे.

“यामुळे राजकीय विरोधकांबाबतीत बायस्ड निर्णय दिले जातील”

पुढे त्यांनी लिहिलं की, “यामुळे राजकीय विरोधकांबाबतीत बायस्ड निर्णय दिले जाऊ शकतात. हे एकंदरीत नैतिकतेसाठी आणि आपल्या लोकशाहीचा महत्त्वाचा स्तंभ असलेल्या न्यायपालिकेसाठी खुप धोकादायक आहे. यावर प्रत्येकाने बोलले पाहिजे असे मला वाटते. जनतेतून रेटा आला तरच सरकारच्या अशा निर्णयांवर अंकुश राहू शकतो. याठीच सांगतोय, यापुढे प्रत्येकानं अशा गोष्टींवर आवाज उठवला तरच आपला देश या हुकूमशाहीच्या जोखडातनं मुक्त होईल.”, अशी पोस्ट किरण माने (Kiran Mane)यांनी केली आहे. ही पोस्ट आता व्हायरल होत आहे.

News Title : Kiran Mane Post on  Ujjwal Nikam appointment

महत्त्वाच्या बातम्या-

कोल्हापुरात अजित पवार गटाला मोठा झटका?, माजी आमदार मविआच्या वाटेवर?

हायकोर्टाने दिला मोठा झटका; 65 टक्के वाढीव आरक्षणाचा निर्णय रद्द

मराठा आरक्षणावर शरद पवारांचं मोठं विधान!

लोकसभेतील अपयश सामूहिक, ‘अकेला देवेंद्र’ जबाबदार नाही’

महागाईचा झटका! पेट्रोल-डिझेलचे दर तब्बल ‘इतक्या’ टक्क्यांनी वाढणार

Join WhatsApp Group

Join Now