Kiran Mane | मराठी अभिनेते आणि ठाकरे गटाचे नेते किरण माने यांनी फेसबुकवर पोस्ट करत थेट केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. देशात सध्या नीट परीक्षावरून वाद सुरू आहे. देशात वैद्यकीय प्रवेश परीक्षा म्हणजे नीटच्या परीक्षेवरुन सावळा गोंधळ सुरु आहे. आधी पेपरफुटी आणि त्यानंतर अचानक रद्द केलेली पीजी परीक्षा, यामुळे संताप व्यक्त केला जातोय.
या मुद्द्यांवर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे तसंच खासदार राहुल गांधी यांनी भाष्य करत केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. त्यातच आता किरण माने (Kiran Mane) यांनी देखील पोस्ट करत केंद्र सरकारवर संताप व्यक्त केलाय.
किरण माने यांची पोस्ट काय?
किरण माने यांनी फेसबुकवर पोस्ट करत म्हटलं की, “केंद्रात कशीबशी सत्ता आली म्हणून कितीही टणाटणा उड्या मारूद्यात… या टग्यांना महाराष्ट्रात ठाकरे, पवारांची आणि देशात राहुल गांधींची जबरदस्त दहशत बसलेली आहे. इलेक्शन कमिशनपास्नं इव्हीएमपर्यन्त सगळे हाताशी घेऊनही जनतेनं लाथ घातल्यामुळे या हुकूमशहांचा माज ठेचला गेलाय.एरवी, मणिपूर धिंड आणि कुस्तीगीर महिला लैंगिक शोषणासारख्या गंभीर मुद्यांकडे माजोरडेपणानं डोळेझाक करणारे हे दगडाच्या काळजाचे लोक… NEET परीक्षेमधल्या घोटाळ्याला या कोडग्यांनी भिकसुद्धा घातली नसती. उडवुन लावलं असतं. पण केंद्रात कुबड्या घेऊन सत्तेत आलेत. न ऐकून सांगतायत कुणाला??
पुढे त्यांनी म्हटलं की, इकडे आदित्य ठाकरेंनी ‘ॲॅंटी पेपर लीक कायदा आणून सीईटी आयुक्तांवर कारवाई करावी’ असा इशारा देणारी दणदणीत प्रेस काॅन्फरन्स घेतली… तिकडे राहुल गांधींनीही असं रान पेटवलं… लगेच अनाजीपंतांपास्नं रंगाबिल्लापर्यंत सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली ! आदित्य ठाकरेंच्या आग्रही मागणीपुढे केंद्रसरकारला नाक घासावं लागलं. ‘ॲॅंटी पेपर लीक’ कायद्याला शेवटी मंजुरी द्यावीच लागली. आता पेपरफुटी प्रकरणातील आरोपींना १० वर्षांची शिक्षा होऊ शकते. डायरेक्टर जनरल सुबोधकुमारलाही हाकलावं लागलं. राहुल गांधींनी केलेल्या गंभीर आरोपांपुढे झुकून युजीसी नेटची आणि NEET ची सीबीआय चौकशीही केली जाणार आहे. पण… एवढंच पुरेसं आहे का?, असा संतप्त सवाल किरण माने (Kiran Mane) यांनी पोस्टद्वारे केलाय.
“प्रतिभावान पोरापोरींचे आयुष्य उद्धवस्त झालंय”
“विद्यार्थ्यांचं आत्तापर्यंत झालेलं नुकसान कोण भरुन देणार??? या परीक्षा रद्द करून तरूण पोरापोरींच्या करीअरशी जीवघेणा खेळ खेळला जातोय. मागच्या दहा वर्षांत जवळजवळ पन्नास पेपर लीक झालेत. कितीतरी हुशार, प्रतिभावान पोरापोरींचे आयुष्य उद्धवस्त झालंय. काहींनी आत्महत्या केल्यात. काहींनी गुणवत्तेला मुरड घालून कमी दर्जाच्या नोकर्या स्विकारल्यात. याचा जाब सरकारला हडसून-खडसुन विचारायला हवा.”, असं किरण माने म्हणाले आहेत.
तसंच पुढे ते म्हणाले की, “या देशात शिक्षण व्यवस्थेचा पुर्णपणे सत्यानाश झालेला आहे. सत्ताधार्यांना ‘हिंदु-मुस्लीम, मराठा-ओबीसी, दलित-सवर्ण, मंदिर-मस्जीद’ यापलीकडे काहीही दिसत नाहीये. देश चालवणे म्हणजे फक्त मंदिर बांधणे नाही ! जमत नसेल तर सरळ राजीनामा देऊन हिमालयात ध्यान करायला जा. ‘काबिल’ माणूस बसवा खुर्चीवर.” असा टोला देखील किरण माने (Kiran Mane) यांनी लगावला.
News Title : Kiran Mane Post on neet exam controversy
महत्त्वाच्या बातम्या-
मोदी सरकार शेतकऱ्यांना करणार खुश?; अर्थसंकल्पात ‘हा’ निर्णय घेण्याची शक्यता
भाजपचे सोशल मीडिया पदाधिकारी आणि सोशल मीडिया समर्थकांमधील वाद पेटला
“मी एकटा पडलोय, पण मी मागे हटणार नाही”, मनोज जरांगेंचं मोठं वक्तव्य
रिसेप्शनसाठी सोनाक्षीने घातली तब्बल ‘इतक्या’ लाखांची साडी; किंमत ऐकून थक्क व्हाल
“येत्या दोन दिवसांत राज्याला हादरवून सोडणारा खुलासा करणार”; बड्या नेत्याच्या ट्वीटने खळबळ






