‘तुम्ही सगळ्या हिंदुंचा ठेका घेतला नाही’; राहुल गांधींच्या वक्तव्यावर किरण माने स्पष्टच बोलले

Kiran Mane | संसदेत हिंदू धर्म हा हिंसा करत असल्याचं वक्तव्य राहुल गांधी यांनी केलं होतं. यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी नाराजी व्यक्त केली आहे. यावर आता मराठी अभिनेते किरण मानेंनी (Kiran Mane) सोशल मीडियावर पोस्ट केली आहे त्याची जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

अभिनेता किरण माने (Kiran Mane) सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारवर हल्लाबोल करत असतात. अशातच राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्यातून संसदेत मोठा गदारोळ झाला असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे नेहमी चर्चेत असलेल्या केतकी चितळेने पोस्ट केली आहे. त्यानंतर आता किरणा मानेंनी (Kiran Mane) त्यांच्या फेसबुकवर पोस्ट केली आहे.

किरण मानेंची पोस्ट चर्चेत

“तुम्ही सगळ्या हिंदुंचा ठेका घेतला नाही. आम्हीही हिंदु आहोत. आमचा धर्म आम्हाला हिंसा आणि द्वेष शिकवत नाही. तुम्ही सांगता तो धर्म आमचा नाही !”…भाजपाच्या खोट्या हिंदुत्वाच्या चिंध्या केल्या काल राहुलजींनी ! संसद हलवून सोडली. ज्याला पप्पू ठरवायला दहा वर्षांत हजारो कोटी रूपये खर्च केले, त्याने एका दिवसांत धर्माच्या नांवावरून भ्रष्टाचाराचा धंदा मांडणार्या या दांभिकांच्या अब्रूची लक्तरं करून चव्हाट्यावर आणली.”काॅंग्रेस भाजपा से नहीं डरती और न उसे किसी को डराने देगी ।”, अशी पोस्ट किरण माने (Kiran Mane) यांनी केली आहे.

<

राहुल गांधींनी नेमकं काय म्हटलं?

राहुल गांधींनी संसदेत बोलत असताना मोठं वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या भाषणातून म्हणाले होते की हिंदुस्ताननं कधीही कुणावर आक्रमण केलं नव्हतं. याचं कारण हिंदुस्तान हा अहिंसेचा देश आहे. आपल्या महापुरूषांनी डरो मत और डराओ मत म्हटलं होतं. भगवान शंकर म्हणतात, डरो मत आणि डराओ मत. दुसरीकडे जी लोकं 24 तास हिंसा-हिंसा-हिंसा, नफरत-नफरत-नफरत करतात ते कधीच हिंदू असूच शकत नाहीत.

राहुल गांधींनी केलेल्या या वक्तव्याने संसदेत गदारोळ घातला. याचे विपरीत परिणाम हे संसदेच्या कामकाजावर होण्याची चिन्हे असू शकतात. यामुळे वातावरण चांगलंच तापलं आहे. अशातच आता मराठी अभिनेत्यांनी याप्रकरणात उडी घेतली आहे. किरण मानेंनी आपल्या पोस्ट मधून मोदी सरकारवर हल्लाबोल केला. केवळ राहुल गांधींना पप्पू म्हणून ठरवायला दहा वर्षात हजारो कोटी रूपये खर्च केले असल्याचं राहुल गांधी म्हणाले आहेत.

News Title – Kiran Mane Facebook Post On Rahul Gandhi And Slam To BJP Government

महत्त्वाच्या बातम्या

सलमानला मारण्यासाठी तब्बल ‘एवढ्या’ लाखांची सुपारी; धक्कादायक माहिती समोर

महाराष्ट्र विधान परिषदेचा अध्यक्ष कोण होणार? ‘या’ तीन भाजप नेत्यांची नावे शर्यतीत

पंकजा मुंडेंना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया

राहुल गांधींनी संसदेत भगवान शंकराचा फोटो का दाखवला? काय आहे यामागचं कारण

बॉयफ्रेंडने लग्नाला नकार दिल्याने गर्लफ्रेंडने केलं धक्कादायक कृत्य