“या बांडगुळांनी लोकसभेत हिंदुत्व हिंदुत्व, मुसलमान मुसलमान करत…”

On: June 24, 2024 5:18 PM
Kiran Mane FB Post
---Advertisement---

Kiran Mane | अभिनेते आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते किरण माने (Kiran Mane) हे त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टने नेहमी चर्चेत असतात. किरण माने (Kiran Mane) पेशाने अभिनेते असले तरीही ते त्यांचं मतं सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडत असतात. देशामध्ये ओबीसी आरक्षण आणि मराठा आरक्षणामुळे राज्याचं वातावरण हे दूषित झाल्याचं दिसून आलं आहे. सत्ताधाऱ्यांनी माध्यमांना हाताशी घेत दिवशभर हाके-जरांगे दाखवून त्यांना पाडण्याशिवाय पर्याय नसल्याचं त्यांनी आपल्या पोस्टमधून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला आहे.

त्यानंतर त्यांनी लिहिलं आहे की मेंदूत कोरून ठेवा की आपण सर्व जातींचा एक समान धागा आहे, तो म्हणजे शेती. या जाती शेतकरी आहेत. हा ओलावा मनात जपून ठेवा जेनेकरून शत्रूचे कटकारस्थान कळेलं, असं किरण मानेंनी (Kiran Mane) फेसबुक पोस्टद्वारे सांगितलं आहे.

किरण मानेंची फेसबुक पोस्ट जशीच्या तशी

सत्ताधाऱ्यांचं बरोबर आहे भावांनो. ते कपटीच आहेत. न्यूज चॅनल्सला हाताशी धरुन दिवसभर ‘हाके-जरांगे’ दाखवून मराठा आणि ओबीसीत फूट पाडण्याशिवाय पर्यायच नाही त्यांना… दोष आपला आहे. आपण जमिनीवर येऊन यामागची कारणं समजून घेत नाही. आपल्यातला दुवा शोधत नाही. मेंदूत कोरून ठेवा, आपल्या सगळ्या जातींत एक समान धागा आहे, तो म्हणजे ‘शेती’! या सगळ्या शेतकरी जाती आहेत. आपल्यातला हा ‘ओलावा’ मनात जपला, तर शत्रूचे कारस्थान कशासाठी आहे हे कळेल… आणि मग त्यांनी कितीही आग लावुद्यात… आपण भडकणार नाही.

मला सांगा, शेतमालाचे भाव कोसळलेले आहेत की नाहीत??? याचा वाईट परिणाम या सगळ्या जातींच्या संसारांवर होतोय. दुधाला मिळणाऱ्या छितपुट भावावर घर कसं चालवणार, हा मराठाओबीसींपुढचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. अवकाळी पाऊस, गारपीट यामुळं नुकसान होऊनसुद्धा मराठा ओबीसींसह अनेकांना पिकविमा मिळालेला नाही… सगळे अस्वस्थ आहेत. खुप शातीरपणे तुमची ही अस्वस्थता तुमच्यातच तेढ निर्माण करायला वापरली जात आहवाढत्या बेरोजगारीचा फटका मराठा पोरांनाही तेवढाच बसतोय, जेवढा ओबीसींना बसतोय, दलितांनाही बसतोय. मुसलमान, बौद्ध, जैन, ख्रिश्चन, पारसी सगळ्यांना बसतोय. पेपर फुटीमुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या सगळ्या बहुजन विद्यार्थ्यांचं करीयर बरबाद झालं आहे.आपल्या मनात एकमेकांविषयी जातींवरून द्वेष निर्माण झाला नाही तर आपला सगळा ‘फोकस’ मुळ प्रश्नांवर होईल… पोटापाण्यावर होईल… जगण्यावर होईल… आणि सत्ताधारी शत्रूचा नाकर्तेपणा उघड होऊन त्यांचे वांदे होतील. मराठा, माळी, धनगर, वंजारी, साळी, कोळी, कोष्टी, सुतार, लोहार, दलित… सगळ्या-सगळ्यांचं जगणं हराम करणारा एकच दुश्मन आहे… भ्रष्ट, लोभी, स्वार्थी आणि कारस्थानी सत्ताधारी !

“या बांडगुळांनी….”

या बांडगुळांनी लोकसभा हिंदुत्व हिंदुत्व,मुसलमान मुसलमान करत लढवली. तिथं जनतेनं मुस्काडात दिली. त्यातून शहाणपणा न शिकता आता मराठा मराठा, ओबीसी ओबीसी, दलित दलित बोंबलत विधानसभेचं जाळं रचलं जातंय. ते उद्धवस्त करूया. लोकसभेला पटात घुसलोय आपण… आता विधानसभेला धोबीपछाड घालून या समाजफोड्यांना आस्मान दाखवूया.
जय शिवराय… जय भीम !
– किरण माने, अशी पोस्ट किरण मानेंनी (Kiran Mane) केली.

News Title – Kiran Mane Facebook Post On Maratha Reservation And OBC Reservation

महत्त्वाच्या बातम्या

पुणे हादरलं! 13 वर्षीय मुलीवर वडील, चुलता आणि भावाकडून बलात्कार

‘अटल सेतू’ प्रकल्पाबाबत महत्त्वाची अपडेट समोर!

‘या समाजालाही ओबीसातून आरक्षण द्या’; मनोज जरांगेंची मोठी मागणी

मोठी बातमी! पुण्यात एसटी बसचा भीषण अपघात, 30 प्रवासी जखमी

‘आराध्या बच्चन आणि माझं हे नातं…’; अखेर सलमान खानकडून सत्य बाहेर

Join WhatsApp Group

Join Now