Kiara Advani Baby Girl | बॉलिवूडमधील सर्वात आवडत्या जोड्यांपैकी एक असलेल्या कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या घरी या वर्षी जुलै महिन्यात कन्यारत्नाचा जन्म झाला. तेव्हापासून चाहत्यांमध्ये एकच चर्चा होती. या कपलच्या मुलीचं नाव काय असणार? अखेर शुक्रवारी कियाराने इन्स्टाग्रामवर एक खास फोटो शेअर करत सर्वांची उत्सुकता संपवली आहे. चिमुकलीच्या लहानशा पायांचा गोंडस फोटो पोस्ट करत तिने आणि सिद्धार्थने मुलीचं नाव अधिकृतपणे जाहीर केलं. (Kiara Advani Baby Girl)
पोस्ट जाहीर होताच सोशल मीडियावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव झाला आहे. फॅन्ससोबतच अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी देखील या खास क्षणावर प्रेमाचा वर्षाव केला आहे. कियाराने लिहिलेल्या भावनिक कॅप्शनमुळे पोस्ट अधिकच हृदयस्पर्शी बनली असून चाहत्यांना त्यांच्या छोट्या राजकुमारीचं नाव ऐकून आनंद झाला आहे.
कियारा–सिद्धार्थच्या मुलीचं नाव ‘सरायाह मल्होत्रा’! :
कियारा आणि सिद्धार्थने त्यांच्या मुलीचं नाव ‘सरायाह मल्होत्रा’ असं ठेवलं आहे. “आमच्या प्रार्थनांपासून आमच्या बाहुपर्यंत… दैवी आशीर्वादापासून आमच्या राजकुमारीपर्यंत” अशा सुंदर शब्दांत त्यांनी मुलीचं नाव जगासमोर आणलं. ‘सरायाह’ हे नाव हिब्रू शब्द सारा पासून घेतल्याचं सांगितलं जात आहे, ज्याचा अर्थ ‘राजकुमारी’ असा होतो. (Kiara Advani Baby Girl)
काही नेटकऱ्यांनी कियारा (Kiara) आणि सिद्धार्थ (Sidharth) या दोन्ही नावांतील अक्षरांवरून ‘सरायाह’ तयार केल्याचीही चर्चा केली. मात्र कोणताही उगम असो, नावाचा अर्थ आणि त्यामागची भावना दोन्हीही अत्यंत सुंदर असल्याचं फॅन्सनी सांगितलं आहे.
Kiara Advani Baby Girl | मुलीच्या जन्मानंतर कपलचं आयुष्य बदललं! :
जुलै महिन्यात मुलीच्या जन्मानंतर कियारा आणि सिद्धार्थने एक भावनिक पोस्ट करून आपला आनंद व्यक्त केला होता. “आमचं हृदय भरून आलं आहे आणि आमचं जग कायमचं बदललं आहे… आमच्या आयुष्यात मुलीचं आगमन झालं आहे,” असं दोघांनी लिहिलं होतं. या पोस्टनंतर चाहत्यांकडून आणि इंडस्ट्रीतील मित्रांकडून शुभेच्छांचा वर्षाव झाला होता. (Kiara Advani daughter name)
तसेच गर्दीपासून मुलीला दूर ठेवण्यासाठी कियारा–सिद्धार्थने नवजात बाळाचे फोटो न घेण्याची विनंतीही केली होती. “हे क्षण आमच्यासाठी अत्यंत खास आहेत. कृपया फोटो किंवा व्हिडीओ घेऊ नका, फक्त आशीर्वाद द्या,” अशी नम्र विनंती त्यांनी केली होती.
लग्न, प्रवास आणि आता खुशाल पाळणा हलला! :
कियारा आणि सिद्धार्थने फेब्रुवारी 2023 मध्ये राजस्थानातील जैसलमेर येथे भव्य शाही पद्धतीने लग्न केलं होतं. लग्नानंतर दोघांनी अनेक देशांत हनिमून आणि प्रवास करत एकत्रित वेळ घालवला. लग्नाच्या दोन वर्षांनंतर त्यांच्या घरात आनंदाचा किरण आला आहे.
मुंबईतील रिलायन्स हॉस्पिटलमध्ये कियाराने मुलीला जन्म दिला. या वर्षी फेब्रुवारीमध्येच तिने प्रेग्नंट असल्याचं जाहीर केलं होतं आणि तेव्हापासून संपूर्ण बॉलिवूडला त्यांच्या बेबीबद्दल उत्सुकता होती.






