SRH ची मालकिण काव्या मारन ‘या’ प्रसिद्ध गायकाला करतेय डेट?

On: March 28, 2025 5:01 PM
Kavya Maran
---Advertisement---

Kavya Maran l आयपीएल २०२५ मध्ये मैदानात खेळाडूंइतकीच चर्चेत असते ती म्हणजे सनरायझर्स हैदराबाद (SRH) संघाची मालकिण काव्या मारन. तिच्या सौंदर्यामुळे आणि भावनिक प्रतिक्रिया दाखवणाऱ्या क्षणांनी ती चाहत्यांच्या मनात घर करून बसली आहे. आता काव्याच्या प्रेमप्रकरणाची अफवा चर्चेत आहे आणि सोशल मीडियावर तिचं नाव दाक्षिणात्य सुपरहिट गायक आणि संगीतकार अनिरुद्ध रविचंदर याच्याशी जोडले जात आहे.

काव्या मारन ही सन ग्रुपचे चेअरमन कलानिधी मारन यांची कन्या असून ती SRH संघाची सह-मालक आहे. काव्या दर सामन्याला स्टेडियममध्ये दिसते आणि तिच्या प्रत्येक प्रतिक्रियेचे फोटो-व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. यंदा तिच्या खाजगी आयुष्याबाबतच्या चर्चांनी सोशल मीडिया गाजवलं आहे.

IPL सामन्याच्या वेळी अनिरुद्धचा परफॉर्मन्स, चर्चेला मिळालं बळ :

IPL 2025 च्या सामन्यापूर्वी अनिरुद्ध रविचंदरने CSK vs MI सामन्यापूर्वी धमाकेदार परफॉर्मन्स दिला. त्याचवेळी काही रिपोर्ट्समध्ये असं म्हटलं गेलं की अनिरुद्ध आणि काव्या एकमेकांना डेट करत आहेत. या चर्चांनंतर चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

‘Why This Kolaveri Di’ या गाण्यामुळे प्रसिद्ध झालेल्या अनिरुद्धने काही दिवसांपूर्वी शाहरुख खानच्या ‘जवान’ सिनेमासाठी तब्बल १० कोटी रुपये मानधन घेतल्याचं रिपोर्ट्समध्ये म्हटलं गेलं आहे. त्यामुळे तो सध्या देशातील सर्वात श्रीमंत आणि महागडे संगीतकारांपैकी एक मानला जातो.

Kavya Maran l टीमकडून अफवांना खंडन, ‘फक्त चांगले मित्र’ :

अनिरुद्धच्या टीमकडून मात्र या डेटिंगच्या चर्चांवर स्पष्ट प्रतिक्रिया देण्यात आली आहे. त्यांनी म्हटलं की, “काव्या आणि अनिरुद्ध फक्त चांगले मित्र आहेत, त्यापलीकडे काहीही नाही”. त्यामुळे हे नातं फक्त मैत्रीपुरतं आहे की अधिक काही, हे सध्या स्पष्ट नाही.

दरम्यान, काव्याच्या चाहत्यांमध्ये तिच्या आयुष्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता कायम आहे. तिचं सौंदर्य, स्मार्टनेस आणि मैदानातील अस्तित्व ही नेहमीच चर्चेचा विषय ठरते.

SRH संघाची कामगिरी आणि काव्याचा भावनिक अंदाज :

सनरायझर्स हैदराबादने यंदा पहिल्या सामन्यात धमाकेदार २८६ धावांची खेळी करत IPL इतिहासातील दुसऱ्या सर्वात मोठ्या धावसंख्येची नोंद केली. पण दुसऱ्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सकडून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यातील काव्याच्या भावनिक प्रतिक्रिया पुन्हा एकदा व्हायरल झाल्या.

SRH संघाचं कर्णधारपद यंदा पॅट कमिन्सकडे असून तो IPL 2025 मधील एकमेव विदेशी कर्णधार आहे. SRH संघ सध्या गुणतालिकेत सहाव्या स्थानी आहे.

News Title: SRH Owner Kavya Maran Dating India’s Richest Singer Anirudh Ravichander? Rumours Spread After IPL Performance

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now