अभिनेत्री करिश्मा कपूरचा सर्वांत मोठा खुलासा, म्हणाली…

On: March 13, 2024 3:12 PM
Karisma Kapoor Big Reveal about personal life
---Advertisement---

Karisma Kapoor | अभिनेत्री करिश्मा कपूर (Karisma Kapoor) बऱ्याच दिवसांपासून इंडस्ट्रीपासून लांब होती. आता लवकरच ती ‘मर्डर मुबारक’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. याच चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान तिने आपल्या भूतकाळाबद्दल मोठा खुलासा केला आहे.

करिश्मा कपूरने अभिनेत्री करीना कपूरच्या अगोदर इंडस्ट्रीमध्ये एंट्री केली होती. मात्र, बराच काळ ती कोणत्याच चित्रपटांत दिसली नाही. तिचा चाहतावर्ग अजूनही बराच मोठा आहे. तिच्या एका अदाने चाहते घायाळ व्हायचे.

अनेक वर्षांनंतर करिश्मा आता ‘मर्डर मुबारक’ सिनेमात दिसणार आहे. त्यामुळे चाहते तिच्या कमबॅकमुळे आनंदित आहेत. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये करिश्माने मोठा खुलासा केला. तिच्या करिअरमध्ये आलेल्या उतार-चढावांबद्दल तिने सांगितलं.

करिश्मा कपूरचा मोठा खुलासा

“आता इंडस्ट्रीमध्ये खूप बदल झाले आहेत. पहिले आम्ही फक्त मनाने विचार करायचो. कोणत्याच गोष्टीचा हिशेब ठेवत नव्हतो. मात्र, आता सगळं काही बदललं आहे. तेव्हा आमच्याकडे कोणती पीआर टीम नव्हती. कोणी स्टायलिश नव्हता. सर्वकाही आमचं आम्ही करायचो. सेटवर जायचो आणि शुटिंग सुरु करायचो. तेव्हा काय करायला हवं, काय करायला नको… याबद्दल कोणी आम्हाला सांगायला नव्हतं. मनात काम करण्याची जिद्द होती म्हणून काम करायचो.”, असं करिश्मा (Karisma Kapoor ) म्हणाली.

‘या’ सिनेमातून करिश्माचं कमबॅक

पुढे ती म्हणाली की, ‘हीरो नंबर 1’ मुळे मला प्रसिद्धी मिळाली. यानंतर मी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. राजा हिंदुस्तानी’ आणि ‘दिल तो पागल है’ यांसारख्या सिनेमांमध्ये मी काम केलं. एखाद्या चित्रपटामुळे किंवा गाण्यामुळे मला प्रसिद्धी मिळेल, असा मी कधीच विचार नाही केला, असं देखील यावेळी करिश्मा म्हणाली.

दरम्यान, करिश्मा कपूरचा (Karisma Kapoor ) ‘मर्डर मुबारक’ हा चित्रपट येत्या 15 मार्च 2024 रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. यामध्ये सारा अली खान, पंकज त्रिपाठी देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. होमी अदजानिया यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे.

News Title : Karisma Kapoor Big Reveal about personal life

महत्त्वाच्या बातम्या –

…म्हणून भाजपला 400 पेक्षा जास्त जागा जिंकायच्या आहेत; उद्धव ठाकरेंचं मोठं विधान

अर्जुन तेंडुलकरची घातक गोलंदाजी! भारी यॉर्कर अन् इशान चीतपट, Video

“आमच्यासोबत या निवडून आणतो”, ठाकरेंची ऑफर अन् गडकरींनी उडवली खिल्ली

धक्कादायक! मुंबईत व्यावसायिकाच्या पत्नीची गळा आवळून हत्या, फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह

सिद्धू मूसेवालाची आई जुळ्या मुलांना जन्म देणार; पण वडिलांनी व्यक्त केली ‘ही’ भीती

Join WhatsApp Group

Join Now