Sanjay Kapur | अभिनेत्री करिश्मा कपूरचे (Karishma Kapur) पूर्व पती आणि बिझनेसमन संजय कपूर (Sanjay Kapur) यांच्या अकस्मात निधनानंतर, त्यांच्या कंपनीचं पुढचं नेतृत्व कोण करणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं होतं. अखेर सना कॉमस्टार या आघाडीच्या मोबिलिटी टेक्नॉलॉजी कंपनीने अधिकृत निवेदनात उत्तर दिलं आहे.
53 व्या वर्षी संजय कपूर यांचे निधन :
संजय कपूर (Sanjay Kapur) यांचे 12 जून 2025 रोजी लंडनमध्ये पोलो खेळताना निधन झाले. खेळादरम्यान चुकून मधमाशी गिळल्याने त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. वयाच्या 53 व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला. संजय हे Sona Comstar या कंपनीचे अध्यक्ष आणि नॉन-एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर होते.
संजयच्या निधनानंतर अनेकांनी विचारले की, त्याच्या कंपनीचं नेतृत्व आता कोण करणार? करिश्मा कपूरसोबत त्याची दोन मुलं आहेत, तसेच तिसऱ्या पत्नी प्रिया सचदेवपासूनही त्याला एक मुलगा आहे. मात्र या कोणालाही कंपनीच्या अध्यक्षपदी स्थान देण्यात आलेलं नाही.
Sanjay Kapur | उत्तराधिकारी ठरला CEO विवेक विक्रम सिंग :
सना कॉमस्टारने अधिकृत निवेदनात सांगितले की, “2019 पासून व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ म्हणून कार्यरत असलेले विवेक विक्रम सिंग (Vivek Vikram Singh) यांच्या नेतृत्वाखाली कंपनी कार्यरत आहे आणि मंडळाच्या देखरेखीखाली त्यांचे नेतृत्व कायम राहील.” संजयच्या दूरदृष्टीमुळे आणि मूल्यांमुळे कंपनीने मोठी भरारी घेतली, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक लवकरच घेण्यात येणार असून, नवीन अध्यक्षाची अधिकृत घोषणा त्यानंतर केली जाईल. मात्र, व्यवस्थापनात कोणताही तातडीचा किंवा मोठा बदल होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
करिश्मासोबतचा घटस्फोट पुन्हा चर्चेत :
संजय कपूर आणि करिश्मा कपूर यांच्यात 2016 मध्ये अधिकृत घटस्फोट झाला होता. घटस्फोटानंतर मुलांचा ताबा करिश्माकडे आला आणि संजयने दरमहा त्यांना आर्थिक मदत देण्याचे मान्य केले होते. आता संजयच्या निधनानंतर ही रक्कम पुढे मिळणार की नाही, याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. (Sanjay Kapur Compnay Successor)
घटस्फोटानंतर संजयने प्रिया सचदेवशी (Priya sachdeo) लग्न केले आणि तिला एक मुलगाही आहे. मात्र, कंपनीच्या उत्तराधिकारी निवडीत त्या कुठल्याच कुटुंबातील सदस्याचा समावेश नाही हे स्पष्ट झालं आहे.






