सैफवर हल्ला झाला त्या रात्री करीना पार्टीत…; सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत

On: January 16, 2025 9:48 AM
Kareena Kapoor statement
---Advertisement---

Saif Ali Khan Attacked | बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर मध्यरात्री एका अज्ञात चोराने धारदार चाकूने वार केल्याची माहिती समोर आली आहे. सैफ अली खानवर वांद्रे येथील राहत्या घरात चाकू हल्ला झाला. मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास ही सर्व घटना घडली. या वृत्तामुळे सर्वत्रच खळबळ उडाली आहे.या घटनेनंतर सैफ अली खानला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून येथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. (Saif Ali Khan Attacked)

याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर दाखल करून तपास सुरू केला आहे.सैफ अली खानवर जेव्हा चाकू हल्ला झाला, त्यावेळी कुटुंबातील इतर सदस्य नेमके कुठे होते,याबाबत कोणतीच माहिती समोर आली नाही. मात्र, सैफ अली खानची पत्नी तथा प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूर ही करिश्मा कपूरसोबत एका पार्टीत असल्याची माहिती आहे.

करीना कपूरची पोस्ट चर्चेत

करिश्मासह करीनाने सोशल मीडियावर 9 तासांपूर्वी एक पोस्ट शेअर केली होती. यामध्ये करीना कपूर, सोनम कपूर आणि करिश्मा कपूर एकत्र असल्याचे पोस्टद्वारे दिसून येत आहे. करीनाने शेअर केलेली ही इन्स्टाग्रामवरील स्टोरी करिश्माने देखील पोस्ट केली. पार्टी झाल्यानंतर करिना कपूर घरी गेल्याचं देखील सांगण्यात येत आहे. (Saif Ali Khan Attacked)

या प्रकरणी मुंबई पोलिसांनी सांगितले की, एका अज्ञात व्यक्तीने अभिनेता सैफ अली खानच्या घरात प्रवेश केला. यानंतर सैफ अली खान आणि अज्ञात व्यक्ती यांच्यात हाणामारी झाली. यावेळी अज्ञात व्यक्तीने सैफ अली खानवर चाकूने हल्ला केला. यात अभिनेता जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

Kareena Kapoor post

सैफच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट

सैफ अली खानला मध्यरात्री 3.30 वाजताच्या सुमारास लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याच्या शरीरावर एकूण सहा जखमा झाल्या आहेत.त्यापैकी दोन जखमा खोलवर झाल्या आहेत. एक जखम त्याच्या पाठीच्या कणाजवळ आहे. त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. लिलावती रुग्णालयातील न्यूरोसर्जन नितीन डांगे, कॉस्मेटिक सर्जन लीना जैन आणि अॅनेस्थेटिस्ट निशा गांधी त्याच्यावर उपचार करत आहेत.

या प्रकरणानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी फोनवरून सैफच्या प्रकृतीविषयी माहिती घेतली. सैफची प्रकृती स्थिर असल्याचं त्यांनी माध्यमांना सांगितलं आहे. सैफ लवकरात लवकर बरा व्हावा, अशी प्रार्थना आता त्याचे चाहते करत आहेत. (Saif Ali Khan Attacked)

News Title :  Kareena Kapoor post before Saif Ali Khan Attacked

महत्वाच्या बातम्या-

‘स्टेप बाय स्टेप सर्व प्रकरणं…’; वाल्मिक कराडच्या पत्नीचा सुरेश धस, बजरंग सोनवणेंना इशारा

घरात घुसून चाकूने सपासप वार, सैफ अली खानसोबत नेमकं घडलं काय?

ब्रेकिंग! अभिनेता सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला, रुग्णालयात उपचार सुरू

‘माझ्या नवऱ्याला बळीचा बकरा बनवलं’; वाल्मिक कराडच्या पत्नीचे गंभीर आरोप

दिवसाची सुरुवातच शुभवार्ताने होईल, आज स्वामी ‘या’ राशींना देणार आशीर्वाद!

Join WhatsApp Group

Join Now