Jio Customer l देशभरात जिओ कंपनीचे अनेक ग्राहक आहेत. कारण जिओने देशभर 5G स्पीड देऊन मोबाईल वापरकर्त्यांना आकर्षित केलं आहे. मात्र गेल्या दोन दिवसांपूर्वी देशभरात जिओचे नेटवर्क डाउन झाले होते. त्यामुळे देशातील अनेक भागांमध्ये जिओच्या सेवा ठप्प झाल्या असल्याने ग्राहकांना या गैरसोयीचा सामना करावा लागला आहे. मात्र त्यानंतर आता जिओने आपल्या ग्राहकांना एक सरप्राइज गिफ्ट दिल आहे. त्यामुळे ग्राहक देखील खुश होणार आहेत.
जिओ कपंनीकडून अनलिमिटेट डेटा प्लॅन गिफ्ट :
जिओ कंपनीकडून आपल्या ग्राहकांना दोन दिवसांसाठी अनलिमिटेट डेटा प्लॅन गिफ्ट करण्यात आला आहे. यासंदर्भात जिओच्या प्रचंड ग्राहाकांना कंपनीकडून एक मेसेज पाठवण्यात आला आहे. यामध्ये जिओ कंपनीने मंगळवारी ग्राहकांना अखंड सेवेचा लाभ घेताना समस्या आल्याबाबत खेद देखील व्यक्त केला आहे.
याशिवाय या मोठ्या गैरसोयीमुळे जिओ वापरकर्त्यांच्या नंबरवर 2 दिवसांचा कॉप्लिमेंटरी अनलिमिटेज प्लॅन देखील लागू करण्यात आला आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे हा प्लॅन पूर्णपणे निशुल्क असणार आहे असे देखील जिओ कंपनीकडून प्रात झालेल्या संदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
Jio Customer l जिओची सेवा ठप्प झाल्याने ग्राहक संतापले :
गेल्या तीन दिवसांपूर्वी जिओचे नेटवर्क ठप्प झाल्यानंतर सोशल मीडियावर ग्राहकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. तसेच यासंदर्भात काही मीम्स देखील व्हायरल झाले होते. संपूर्ण मुंबईसह देशभरात जिओची सेवा ठप्प असल्याचा दावा जिओ वापरकर्त्यांकडून करण्यात आला होता. तसेच अनेक ठिकाणी कित्येक तासांहून जिओ नेटवर्कची समस्या कायम होती.
याशिवाय ब्रॉडबैंड सेवेबाबतही अनेक युजर्सनी तक्रारी केल्या होत्या. यामध्ये आउटेजचा मागोवा घेणाऱ्या Downdetector ने देखील जिओच्या आउटेजची देखील पुष्टी केली होती. यावेळी Downdetector च्या नकाशानुसार नवी दिल्ली, नागपूर, कटक, हैदराबाद, लखनौ, चेन्नई, पाटणा, कोलकाता, गुवाहाटी,अहमदाबाद या शहरांमध्ये जिओची सेवा ठप्प झाली होती. परंतु आता जिओ कंपनीने ग्राहकांना खूश करण्यासाठी दोन दिवसांचा कॉप्लिमेंटरी प्लॅन दिला आहे.
News Title : Jio gives two days complimentary unlimited plan for customer
महत्वाच्या बातम्या –
बापरे! तिरुपती प्रसादाच्या लाडूत चक्क ‘या’ प्राण्यांची चरबी; देवस्थान समितीचे सदस्य म्हणाले…
सतर्क! ‘या’ जिल्ह्यांत वीजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता
घटस्फोटाच्या चर्चा दरम्यान, अभिषेक बच्चनने उचललं मोठं पाऊल!
महायुती आणि मविआला टक्कर देण्यासाठी महाराष्ट्रात तिसरी आघाडी तयार; ‘या’ पक्षांचा समावेश
काँग्रेसने मुख्यमंत्रीपदावर दावा करू नये, राऊतांच्या वक्तव्यामुळे माविआमध्ये फूट पडणार?






