मोठी बातमी! जयदीप आपटेला ‘इतक्या’ दिवसांची पोलीस कोठडी

On: September 5, 2024 5:06 PM
Jaydeep Apte
---Advertisement---

Jaydeep Apte l गेल्या काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची दुर्घटना घडली होती. या घटनेमुळे राज्यात संतापाची लाट उसळली होती. महाराजांचा हा पुतळा ८ महिन्यांपूर्वी उभारण्यात आला होता. मात्र तरी देखील छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा कोसळला. या दुर्घटनेनंतर राज्यातील शिवप्रेमींसह विरोधकही आक्रमक झाले होते.

जयदीप आपटेला 6 दिवस पोलीस कोठडी :

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे हा फरार झाला होता. मात्र यानंतर तब्बल 11 दिवसांनी फरार असलेल्या मुख्य आरोपी जयदीप आपटेला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. यानंतर जयदीप आपटेला आज मालवण न्यायालयात देखील हजर करण्यात आले होते. त्यानंतर अखेर मालवण न्यायालयाने जयदीप आपटेला तब्बल 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

सिंधुदुर्गातील महाराजांचा हा पुतळा 26 ऑगस्ट रोजी कोसळला होता. त्यानंतर शिल्पकार व मुख्य आरोपी जयदीप आपटे हा फरार झाला होता. यानंतर पोलिसांनी जयदीप आपटे विरुद्ध लूकआऊट नोटीस देखील जारी केली होती. तसेच मालवण पोलीस, ठाणे पोलीस आणि कल्याण ग्रामीण पोलिसांची पाच पथकं जयदीपचा कसून शोध घेत होती.

Jaydeep Apte l जयदीपला पकडण्यात पोलिसांना यश :

मात्र जयदीप आपटे हा त्यांच्या हाती गेले काही दिवस लागत नव्हता. पण काल जयदीप आपटे हा अंधाराचा फायदा घेत पोलिसांची नजर चुकवत आपल्या पत्नी आणि आईला भेटण्यासाठी कल्याणला आला होता. अगदी त्याचवेळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे.

यानंतर शिल्पकार जयदीप आपटेला कल्याण पोलिसांनी मालवण पोलिसांच्या स्वाधीन देखील केले. यानंतर जयदीप आपटेला मालवणमध्ये आणून मालवण न्यायालयासमोर हजर करण्यात आले. अशातच आज आता दिवाणी न्यायाधीश महेश देवकते यांच्यासमोर सुनावणी पार पडली. यावेळी सरकारी वकील तुषार भनगे यांनी देखील बाजू मांडली. तर आरोपीचे वकील गणेश सोहनी यांनी देखील त्याची बाजू मांडली. या दोन्हीही बाजू ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी जयदीप आपटेला तब्बल 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. म्हणजेच आता जयदीप आपटे हा १० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत राहणार आहे.

News Title : Jaydeep Apte police custody till 10 September

महत्त्वाच्या बातम्या-

राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये; ठाकरे गटाला दिला मोठा धक्का

ठाकरेंच्या पक्षाकडून कोणाला तिकीट मिळणार? संभाव्य उमेदवारांची यादी

‘….म्हणून मी या अभिनेत्रीला सुरक्षा देतो’; सलमानच्या बाॅडीगार्डचा मोठा खुलासा

गौतमी पाटील विधानसभा निवडणूक लढवणार? म्हणाली मी आता…

‘एकाच महिलेला किती…’; राष्ट्रवादीत ‘रुपाली विरुद्ध रुपाली’ वाद

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now