Jay Bhanushali Divorce | २०२५ हे वर्ष सेलिब्रिटी विश्वासाठी घटस्फोट आणि विभक्त होण्याच्या बातम्यांनी गाजले. अनेक प्रसिद्ध जोड्यांनी आपापल्या नात्यांना पूर्णविराम दिला. याच पार्श्वभूमीवर आता टीव्ही विश्वातील लोकप्रिय जोडी जय भानुशाली आणि माही विज (Mahi Vij separation) यांनी परस्पर संमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले आहे. त्यांच्या या निर्णयामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. (Jay Mahi split)
गेल्या काही महिन्यांपासून जय आणि माही यांच्या नात्याबाबत विविध चर्चा सुरू होत्या. मात्र या अफवांवर आता दोघांनी स्वतःच शिक्कामोर्तब केले आहे. तब्बल १४ वर्षांचे वैवाहिक आयुष्य संपुष्टात आणत त्यांनी घटस्फोटाची अधिकृत घोषणा केली असून, या बातमीनंतर मनोरंजन विश्वात खळबळ उडाली आहे. (TV celebrity divorce news)
इन्स्टाग्राम पोस्टमधून घटस्फोटाची घोषणा :
जय भानुशाली आणि माही विज यांनी एकत्र बसून हा निर्णय घेतला आहे. दोघांनी इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करत घटस्फोटाची माहिती दिली. त्यांनी स्पष्ट केले की, त्यांच्या नात्यात कोणतीही चूक, दोष किंवा नकारात्मकता नव्हती. हा निर्णय मनाची शांती, परस्पर आदर आणि चांगल्या भविष्यासाठी घेतल्याचे त्यांनी सांगितले आहे.
पोस्टमध्ये त्यांनी नमूद केले की, आयुष्याच्या अशा टप्प्यावर ते पोहोचले आहेत जिथे वेगळे होणे हेच योग्य वाटले. त्यांच्या नात्यात प्रेम, समजूतदारपणा आणि एकमेकांबद्दल आदर होता, मात्र आता वेगवेगळ्या मार्गांनी पुढे जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
Jay Bhanushali Divorce | ‘या निर्णयात कोणीही व्हिलन नाही’ :
आपल्या पोस्टमध्ये जय आणि माही यांनी स्पष्टपणे नमूद केले की, या घटस्फोटात कोणीही व्हिलन नाही. हा निर्णय कोणत्याही वाद, नकारात्मकता किंवा बाह्य कारणांमुळे घेतलेला नाही. मानसिक आरोग्य, शांती आणि आनंदासाठी हे पाऊल उचलल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
दोघांनी एकमेकांचा कायम आदर ठेवण्याचे आणि भविष्यातही एकमेकांना पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच चाहत्यांनी आणि माध्यमांनी त्यांच्या गोपनीयतेचा सन्मान करावा, अशी विनंतीही त्यांनी केली आहे. (Jay Bhanushali Divorce)
जय भानुशाली आणि माही विज यांना सहा वर्षांची मुलगी तारा असून, तिचा सांभाळ दोघेही मिळून करत आहेत. २०११ साली विवाहबंधनात अडकलेली ही जोडी टीव्ही विश्वातील सर्वात लोकप्रिय कपलपैकी एक मानली जात होती. लग्नापूर्वीही ते अनेक वर्षे एकमेकांना डेट करत होते. मात्र आता त्यांच्या १५ वर्षांच्या सहजीवनाला पूर्णविराम मिळाला आहे.






