“तुझं तोंड बंद कर, नीच आणि गलिच्छ माणसा…”; जावेद अख्तर भडकले

On: March 6, 2025 2:09 PM
Javed Akhtar
---Advertisement---

Javed Akhtar | भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या वजनावर टीका करणाऱ्या एका सोशल मीडिया यूजरला ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी तिखट शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे.

विराट कोहलीच्या (Virat Kohli) चॅम्पियन्स ट्रॉफीमधील चमकदार कामगिरीचे कौतुक करणाऱ्या जावेद अख्तर यांच्या पोस्टवर एका यूजरने रोहितच्या शरीरयष्टीवर अपमानास्पद टिप्पणी केली. त्यावर जावेद अख्तर यांनी संतप्त प्रतिक्रिया देत ट्रोलरला झापले.

नेमकं झालं काय?

जावेद अख्तर यांनी ट्विटरवर टीम इंडियाचे आणि विराट कोहलीचे कौतुक करत पोस्ट केली होती. “पुन्हा एकदा विराटने सिद्ध केले की तो भारतीय क्रिकेटचा सर्वात मजबूत आधारस्तंभ आहे. टीम इंडियाचे अभिनंदन!”, अशी ती पोस्ट होती.  याच पोस्टवर अनेकांनी वेगवेगळ्या  प्रतिक्रिया दिल्या, मात्र एका यूजरने रोहित शर्माच्या वजनावरून उपहासात्मक टीका केली.

या यूजरने कमेंट केली की, “जर विराट सर्वात मजबूत आधारस्तंभ असेल, तर रोहित शर्मा कोण आहे? सर्वात वजनदार स्तंभ? भारतीय कॅप्टनला वजनदार पाहून तुम्हाला लाज वाटली पाहिजे.”

जावेद अख्तर यांचे प्रत्युत्तर 

ही प्रतिक्रिया पाहून जावेद अख्तर (Javed Akhtar) यांना राग अनावर झाला आणि त्यांनी संतप्त शब्दांत प्रत्युत्तर दिले. “तुझे तोंड बंद कर! तू झुरळ आहेस. मी रोहित शर्मा आणि भारतीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्व महान खेळाडूंचा सन्मान करतो. रोहितसारख्या दिग्गज खेळाडूबद्दल मी कधीच वाईट बोललो नाही. तू एक नीच आणि गलिच्छ माणूस आहेस, जो मी कधीही न केलेला दावा माझ्यावर लादत आहेस आणि स्वतःचा वेळ वाया घालवत आहेस.” त्यांची ही पोस्ट आणि प्रतिक्रिया आता व्हायरल झाली आहे.

Javed Akhtar comment

Title : Javed Akhtar slams troll for mocking Rohit Sharma’s weight

 

Join WhatsApp Group

Join Now