Jasprit Bumrah च्या करिअरला धोका? दिग्गज बॉलरचा भारतीय टीमला इशारा

On: March 12, 2025 3:11 PM
Jasprit Bumrah
---Advertisement---

 टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) सध्या जगातील सर्वोत्तम फास्ट बॉलर मानला जातो. मात्र, न्यूझीलंडचा माजी दिग्गज गोलंदाज शेन बॉन्ड (Shane Bond) याने बुमराहच्या फिटनेसबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. त्याने स्पष्ट इशारा दिला आहे की, बुमराहच्या पाठीला पुन्हा दुखापत झाली तर त्याचं करिअर संपुष्टात येऊ शकतं. त्यामुळे भारतीय टीम मॅनेजमेंटनं त्याच्या वर्कलोडवर नियंत्रण ठेवण्याची गरज असल्याचं बॉन्डने सांगितलं आहे.

बुमराहच्या वर्कलोडवर तातडीने लक्ष देण्याची गरज :

बुमराहने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात दमदार गोलंदाजी करत भारतीय संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेले होते. मात्र, अखेरच्या कसोटी सामन्यात दुखापतीमुळे तो गोलंदाजी करू शकला नाही, आणि टीम इंडियाला मालिका बरोबरीत सोडावी लागली. या दुखापतीमुळे बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये खेळू शकला नाही, मात्र तो आता IPL 2025 मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्यासाठी सज्ज होत आहे.

शेन बॉन्डने ESPN शी बोलताना सांगितले की, “बुमराहच्या पाठीला जिथे सर्जरी झाली होती, तिथे पुन्हा दुखापत झाली, तर त्याचं करिअर संपण्याची शक्यता आहे.” त्यामुळे भारतीय संघ व्यवस्थापनाने त्याच्या वर्कलोडवर लक्ष देण्याची वेळ आली आहे.

Jasprit Bumrah l IPL नंतर लगेच 5 कसोटी सामने खेळणे धोकादायक! :

शेन बॉन्डच्या मते, फास्ट बॉलरने कसोटी क्रिकेटनंतर थेट T20 क्रिकेट खेळणे जोखमीचे असते. त्यामुळे भारतीय संघाने त्याच्या खेळण्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.

बॉन्ड पुढे म्हणतो, “बुमराह उत्तम फिट राहील, पण त्यासाठी त्याला योग्यवेळी विश्रांती मिळायला हवी. आयपीएलनंतर लगेच 5 कसोटी सामने खेळणं धोकादायक ठरू शकतं. इंग्लंड दौऱ्यात त्याने दोनपेक्षा जास्त कसोटी सामने खेळू नयेत.”

शेन बॉन्ड हा मुंबई इंडियन्सचा माजी गोलंदाजी प्रशिक्षक होता आणि त्याने बुमराहसोबत अनेक वर्षे काम केले आहे. त्यामुळे त्याच्या इशाऱ्याला गांभीर्याने घेणे भारतीय संघ व्यवस्थापनासाठी महत्त्वाचे आहे.

News Title: Jasprit Bumrah’s Career at Risk? Shane Bond Warns Team India

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now