मुंबई इंडियन्स IPL ट्रॉफीपासून वंचित राहणार? कारण आलं समोर

On: March 21, 2025 10:40 AM
Mumbai Indians
---Advertisement---

mumbai indians l आयपीएल सुरू होण्यास अवघे दोन दिवस उरले असताना मुंबई इंडियन्सच्या प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या फिटनेसबाबत सस्पेन्स कायम आहे. बुमराहने एका आठवड्यात दुसऱ्यांदा बेंगळुरूतील नॅशनल क्रिकेट अकादमी (NCA) गाठली आहे.कारण सध्या त्याची फिटनेस चाचणी सुरू असून अंतिम निर्णय लवकरच होणार आहे.

याआधी झालेल्या फिटनेस चाचणीमध्ये बुमराहला गोलंदाजी करताना थोडासा त्रास जाणवत होता. त्यामुळे त्याला NCAने विशिष्ट व्यायाम करून पुन्हा परत येण्यास सांगितले होते. आता दुसऱ्यांदा फिटनेस चाचणीसाठी हजेरी लावल्याने, IPL 2025 मध्ये त्याचा सहभाग अजूनही अनिश्चित आहे.

“फिटनेसमध्ये अडथळा नसेल तरच खेळू शकतो” :

मिळालेल्या माहितीनुसार, जर बुमराह कोणत्याही वेदना किंवा अडचणीशिवाय गोलंदाजी करू शकला, तरच त्याला स्पर्धेत खेळण्याची परवानगी दिली जाईल. क्रिकेट तज्ज्ञांच्या मते, बुमराहच्या पूर्ण तंदुरुस्तीला किमान एक आठवड्याचा कालावधी लागेल. त्यामुळे IPLच्या पहिल्या काही सामन्यांमध्ये तो खेळू शकेल का? यावर प्रश्नचिन्ह कायम आहे.

मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनीही पत्रकार परिषदेत सांगितले की, “बुमराहच्या पुनर्वसन प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. सध्या गोष्टी योग्य दिशेने जात आहेत, पण त्याचा सहभाग हा दिवसागणिक ठरणारा आहे.”

mumbai indians l बुमराह नाही, तर कोण? :

मुंबई इंडियन्सचा पहिला सामना 23 मार्चला चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध चेपॉकमध्ये होणार आहे. जसप्रीत बुमराहची गैरहजेरी ही संघासाठी मोठी चिंता ठरू शकते. मात्र संघाकडे ट्रेंट बोल्ट, दीपक चाहर, रीस टॉपली, कोर्बिन बॉश यांसारखे पर्यायी गोलंदाज आहेत. तसेच हार्दिक पांड्या आणि अर्जुन तेंडुलकरदेखील गोलंदाजीत भूमिका बजावू शकतात.

तथापि, जसप्रीत बुमराहसारख्या अनुभवी आणि डेथ ओव्हर स्पेशालिस्ट गोलंदाजाची जागा भरून काढणं सोपं नाही. त्यामुळे त्याच्या फिटनेसवर संपूर्ण हंगामाचा मोठा प्रभाव पडू शकतो. मात्र या कारणामुळे मुंबई इंडियन्स विजतेपदापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

News Title: Jasprit Bumrah Visits NCA Again Before IPL 2025; Fitness Uncertainty Continues

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now